पाकिस्तानचा मोस्ट वॉंटेड दहशतवादी मोहंमद खुरासनी ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाकिस्तानचा मोस्ट वॉंटेड दहशतवादी मोहंमद खुरासनी ठार

पाकिस्तानचा मोस्ट वॉंटेड दहशतवादी मोहंमद खुरासनी ठार

इस्लामाबाद : पाकिस्तानचा मोस्ट वॉंटेड दहशतवादी, तेहरिक तालिबान पाकिस्तान संघटनेचा प्रवक्ता कमांडर खालिद बटली ऊर्फ मोहंमद खुरासनी आज मारला गेला आहे. पाकिस्तान सीमेलगत असलेल्या अफगाणिस्तानच्या पूर्व नांगरहार प्रांतात मारला गेल्याचे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने माहिती दिलीये. टीटीपीने पाकिस्तानात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. यात २०१४ रोजी सैनिक शाळेवरचा हल्ला सर्वात मोठा भीषण मानला जातो आणि त्यात दीडशेहून अधिक मुले मारली गेली होती.

हेही वाचा: दुसऱ्या महायुद्धावेळी सैनिकानं आईला पाठवलं पत्र; 77 वर्षांनी मिळालं पण...

पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने खुरासनी मारल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र सविस्तर माहिती देण्यास नकार दिला. एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी अफगाणिस्तानात आणि सीमेवर खुरासनीची माहिती गोळा केली आणि त्याचा मागोवा घेतला. तो सापडताच ठार केले.

हेही वाचा: 'लवकर भेटू', म्हणत ६० वर्षीय वृद्धाने स्वीकारला इच्छामृत्यू

खुरासनीला कोणी मारले, याबाबतचा पाकिस्तानने खुलासा केलेला नाही. मोहंमद खुरासनी हा गिलगिट बाल्टिस्तानचा रहिवासी होता. तो २००७ मध्ये खैबर पख्तुनख्वा प्रांतात स्वात भागात एका कट्टरपंथीयात सामील झाला. तो दहशतवाद्यांचा म्होरक्या मुल्ला फजलुल्लाह याचा निकटवर्तीय बनला आणि पुढे तो टीटीपीचा प्रमुख बनला. २०१४ रोजी खुरासनी टीटीपीचा प्रवक्ता म्हणून नेमले. तेव्हापासून त्याने दहशतवादी कारवायांन वेग दिला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top