Hijab case
Hijab caseटिम ई सकाळ

Hijab Row: इतर देशांनी भारताच्या अंतर्गत बाबींवर ढवळाढवळ करू नये; भारताचे प्रत्युत्तर

हिजाब प्रकरणावर अमेरिका आणि पाकिस्तानने टिका केली आहे
Published on

गेल्या काही दिवसांपासून भारतात हिजाब (Hijab) प्रकरणावरून चांगलात वाद रंगलाय. या प्रकरणावर देशभरातून पडसाद उमटले. आता या प्रकऱणात इतर राष्ट्रांनी प्रतिक्रिया देत टिका करायला सुरवात केली आहे. यावर भारताने या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या इतर देशांना भारताच्या अंतर्गत बाबींवर ढवळाढवळ न करण्यासंदर्भात सुनावलं आहे.

नुकतीच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी (Shah Mehmood Qureshi) यांनी यावरून भारतावर निशाणा साधला होता तर अमेरिकेनं (America) म्हटलंय की महाविद्यालयांमध्ये हिजाबवर बंदी घालणं हे धार्मिक स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे. धार्मिक कपड्यांना परवानगी द्यायची की, नाही हे कर्नाटकनं ठरवू नये. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या देशांना चांगलेच सुनावले आहे.

Hijab case
रेल्वेने प्रवास करताय? काही अडचण आल्यास 'या' नंबरवर करा कॉल

कर्नाटकमधील महाविद्यालयांमध्ये सुरू असलेला हिजाबवरील प्रकरणाची सुनावणी कर्नाटक उच्च न्यायालयात (Karnataka High Court) सुरू आहे. हा मुद्दा आमच्या घटनात्मक चौकटीत बसतो आणि आम्ही हा सोडवतोय” असे परराष्ट्र मंत्रालयाकडुन सांगण्यात आले आहे. “जे भारताला चांगल्याने ओळखतात, ते ही सर्व परिस्थिती समजून घेतील पण आमच्या अंतर्गत मुद्द्यांवर हेतुपुरस्सर करण्यात येणारी विधानं आम्ही सहन करणार नाही” असेही परराष्ट्र मंत्रालयाकडुन सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com