मुकेश अंबानी vs जेफ बेजोस; 25 हजार कोटींच्या करारासाठी दोन अब्जाधीशांची टक्कर

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 26 October 2020

रिलायन्स आणि फ्यूचर ग्रुपमध्ये झालेल्या कराराला स्थगिती देण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे

नवी दिल्ली- सिंगापूरच्या एका न्यायालयात अॅमेझॉनच्या याचिकेवर सुनावणी झाली. यात रिलायन्स आणि फ्यूचर ग्रुपमध्ये झालेल्या कराराला स्थगिती देण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. रिलायन्सने फ्युचर ग्रुपचा रिटेल आणि होलसेल व्यवसाय खरेदी करण्यासाठी 24,713 कोटी रुपयांचा करार केला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर रिलायन्स ग्रुपकडून एक प्रेस नोट जारी करण्यात आली आहे. 

भारतीय कायद्यानुसार झाला करार

प्रेस नोटमध्ये सांगण्यात आलंय की, रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडला सिंगापूर न्यायालयाच्या निर्णयाबाबत कळालं आहे. रिलायन्सने फ्युचर रीटेलच्या व्यवसाय आणि असेट्सचे अधिग्रहन केले आहे. या करारासोबत पुढे जाण्याआधी कायदेशीर सल्ला घेण्यात आला आहे. तसेच भारतीय कायद्याला लक्षात घेऊन याचा करार पूर्ण करण्यात आला आहे. शिवाय आम्ही आपल्या अधिकारांना लक्षात घेऊन लवकरात लवकर याचे ट्रान्जेक्शन करु इच्छितो. 

पंजाबमध्ये रावणाला PM मोदींचा मास्क, जेपी नड्डा राहुल गांधींवर संतापले

अॅमेझॉनने गेल्या वर्षी फ्यूचर ग्रुपच्या एका कंपनीची 49 टक्के हिस्सा घेण्याची तयारी दाखवली होती. यामध्ये एक अट होती की, अॅमेझॉनला 3 ते 10 वर्षांच्या अवधीनंतर फ्यूचर रिटेल लिमिटेडची हिस्सेदारी विकत घेण्याचा अधिकार असेल. त्यातच किशोर बियानीच्या ग्रुपने आपला व्यवसाय रिलायन्स इन्डस्ट्रीजला विकण्याचा करार केला. याच्याविरोधात अॅमेझॉनने न्यायालयात धाव घेतली.  

कराराला स्थगिती देण्याचा आदेश

अॅमेझॉन-फ्यूचर-रिलायन्स प्रकरणात मध्यस्थ वीके राजा यांनी अॅमझॉनचा बाजूने आपला निर्णय दिला. त्यांनी फ्यूचर ग्रुपला आपला करार पुढे न घेऊन जाण्यास सांगितले आहे. जोपर्यंत न्यायालयात अंतिम निर्णय येत नाही, तोपर्यंत करार न करण्याचा आदेश दिला आहे. अॅमेझॉनच्या प्रवक्त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. अॅमेझॉनचे म्हणणं आहे की, फ्यूचर ग्रुपने रिलायन्ससोबत भागिदारी करुन त्यांच्यासोबत केलेल्या कराराचं उल्लंघन आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mukesh ambani and jef bezos amazon future reliance deal