
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदची टेरर फंडिंगप्रकरणी निर्दोष सुटका
लाहोर : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा (२६/११) मुख्य सूत्रधार असलेला हाफीज सईद याच्यासह त्याच्या सहा सहकाऱ्यांची लाहोर हायकोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे. या सर्वांवर टेरर फंडिंगप्रकरणी खटला सुरु होता. लाहोर हायकोर्टानं सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करत हा निर्णय दिला.
हेही वाचा: वानखेडेंविरोधात पुरावे असतील तर मलिकांनी कोर्टात जावं - NCB
हे सर्व सहाही जण पाकिस्तानातील जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत. लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज यानेच 'जमात'चीही स्थापना केली आहे. या वर्षी एप्रिल महिन्यात लाहोरमधील दहशतवादविरोधी सत्र न्यायालयानं मलिक जाफर इक्बाल, याहया मुजाहिद, नसरुल्लाह, शामीउल्लाह आणि उमर बहादूर यांना नऊ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. त्याचबरोबर हाफिज सईदला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षाही सुनावण्यात आली होती. यामध्ये मलिक जाफर इक्बाल, याहा मजाहिद, उमर बहादूर याचा समावेश आहे. दरम्यान, हाफिज सईदला ६ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती पंजाब पोलिसांच्या काउंटर टेररिझम डिपार्टमेंटने (CTD) ही माहिती दिली.
हाफिज सईदवर काय होता आरोप?
कुख्यात दहशतवादी टेरर फंडिंग केसमध्ये दोषी आढळले होते. विशेषतः पैसा गोळा करणे आणि तो लष्कर-ए-तोयबाच्या खात्यात वर्ग करण्याचा त्यांच्यावर आरोप होता. याद्वारे प्रतिबंधित दहशतवादी संघटनेला बेकायदेशीरपणे वित्तपुरवठा केला गेला. दरम्यान ट्रायल कोर्टाने 'जमात'च्या सदस्यांना टेरर फंडिंड संबंधित आरोपांमध्ये दोषी ठरवलं तसेच टेरर फंडिंगमधून गोळा केलेल्या निधीतून तयार केलेल्या मालमत्ता जप्तीचे आदेश दिले होते.
Web Title: Mumbai Attack Mastermind Hafiz Saeed Acquitted In Terror Funding Case In Pakisatan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..