मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लष्कर ए तोयबाचा म्होरक्या जकी-उर-रहमानला अटक

सकाळ ऑनलाइन टीम
Saturday, 2 January 2021

दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातून त्याला अटक करण्यात आली आहे.

इस्लामाबाद- पाकिस्तानी माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लष्कर ए तोयबाचा म्होरक्या जकी-उर-रहमान लख्वीला टेरर फंडिंगप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातून त्याला अटक करण्यात आली आहे. परंतु, त्याच्या अटकेचा आणि मुंबई हल्ल्याचा काही संबंध नसल्याचे बोलले जाते. 

पाकिस्तानमधील पंजाबच्या दहशतवादविरोधी विभागाच्या प्रवक्त्याने लक्खवीला लाहोरमधून अटक केली आहे. दवाखान्याच्या नावावर मिळत असलेला निधी दहशतवादी कृत्यांसाठी केला जात असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. लख्वीला 2008 मध्ये मुंबई हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी म्हणून जाहीर केले होते. 

हेही वाचा- गॅस बुकिंगसाठी द्या फक्त मिसकॉल; इंडियन ऑइलची नवी सुविधा

फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सकडून (एफटीए) ब्लॅकलिस्टमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी पाकिस्तान अशा प्रकारच्या बनावट कारवाया करतो, असा आरोप केला जातो. दहशतवाद्याच्या विरोधात कारवाईच्या नावाखाली इस्लामाबादमध्ये राहून कारवाई केल्याचा देखावा दाखवला जातो. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानची केंद्रीय तपास संस्थेने (एफआयए) 'मोस्ट वाँटेड' च्या नव्या यादीत मुंबई हल्ल्यात सामील असलेल्या 11 दहशतवाद्यांच्या नावाचा समावेश केला आहे. 

हेही वाचा- Reliance Jio ला टक्कर, एअरटेल देत आहे 199 रुपयांत रोज 1.5 जीबी डेटा

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड
दि. 26 नोव्हेंबर 2008 मध्ये पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्थेच्या मदतीने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात अनेक विदेशी व्यक्तींसह सुमारे 155 जणांना जीव गमवावा लागला होता. या हल्ल्याचा मास्टरमाइंड जकी उर रहमान लख्वीला पाकिस्तानात अटक केल्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai terror attack mastermind and Lashkar e Toiba leader Zaki ur Rehman arrested in pakistan