
199 रुपयांच्या एअरटेल प्रीपेड प्लॅनमध्ये आता 28 दिवसांसाठी 1.5 जीबी डेटा ऑफर करण्यात आला आहे. म्हणजेच ग्राहकांना एकूण 42 जीबी डेटा वापरायला मिळू शकतो. त्याचबरोबर देशभरात प्रत्येक नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस फ्री मिळतील.
नवी दिल्ली- भारती एअरटेलने 199 रुपये रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा देण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे नुकताच रिलायन्स जियोने देशांतर्गत कॉलिंग फ्री देण्याची घोषणा करताना त्यांचा हा प्लॅन एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाच्या तुलनेत बेस्ट असल्याचा दावा केला होता. आतापर्यंत एअरटेलच्या 199 रुपयांच्या प्रीपेड पॅकमध्ये दररोज 1 जीबी डेटा मिळत होता. परंतु, आता या प्लॅनमध्ये 1.5 जीबी डेटा दिला जाणार आहे.
परंतु, या प्लॅनचा फायदा केवळ निवडक ग्राहकांना मिळणार आहे. एअरटेलच्या वेबसाइटवर आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक टेलिकॉम सर्कलमध्ये काही खास नंबर्सवर 199 रुपयांच्या रिचार्जवर दररोज 1.5 जीबी डेटा ऑफर केला जात आहे.
हेही वाचा- मुंबईत कार विक्रीचा टॉप गिअर, डिसेंबरमध्ये कार विक्रीने घेतला चांगला पिकअप
199 रुपयांच्या एअरटेल प्रीपेड प्लॅनमध्ये आता 28 दिवसांसाठी 1.5 जीबी डेटा ऑफर करण्यात आला आहे. म्हणजेच ग्राहकांना एकूण 42 जीबी डेटा वापरायला मिळू शकतो. त्याचबरोबर देशभरात प्रत्येक नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस फ्री मिळतील. या रिचार्जबरोबर ग्राहकांनी फ्री हॅलो ट्यून्स, विंक म्युझिक सब्सक्रिप्शन आणि एअरटेल एक्सट्रिम ऍपचेही सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते.
हेही वाचा- Gold Price - आठवड्याभरात सोने - चांदीच्या दरात किरकोळ वाढ; जाणून घ्या भाव
विशेष म्हणजे, एअरटेलबरोबर 249 रुपयांचा प्रीपेड पॅकही रिचार्जसाठी उपलब्ध आहे. 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये सर्व ऑफर्स 199 रुपयांचे आहेत. परंतु, यामध्ये फॉस्टॅग कॅशबॅकवर 100 कॅशबॅक आणि एक वर्षांसाठी शॉ ऍकडमी ऑनलाइन कोर्सही उपलब्ध आहे. 199 आणि 249 रिचार्ज प्लॅनदरम्यान एअरटेलकडे 219 रुपयांचाही प्लॅन आहे. या पॅकबरोबर 28 दिवसांसाठी 1 जीबी डेटा दररोज मिळतो.