नवी दिल्ली - एलपीजी सिलिंडर भरून घेण्यासाठीची प्रक्रिया सोपी आणि सहज झाली असून केवळ एका मिस कॉलवर बूकिंग करता येणार आहे. इंडियन ऑइलने शुक्रवारी याबाबत अधिकृत माहिती दिली. एलपीजी ग्राहकांना सिलिंडर भरण्यासाठी देशात कुठूनही एक मिसकॉल द्यावा लागणार आहे. यासाठी इंडियन ऑइलने एक नंबरही जारी केला आहे.

ग्राहकांना बुकिंग करण्यासाठी आधी जी पद्धत होती त्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. फक्त मिस कॉल देऊन बूकिंग करता येईल. तसंच ग्राहकांना कॉलसाठी शुल्कही लागणार नाही. सध्या आयव्हीआरएस कॉल सिस्टिममध्ये कॉलसाठी सामान्य शुल्क लागत होते. नव्या बूकिंग सिस्टीमसाठी फक्त मिस कॉल द्यावा लागेल.
हे वाचा - LPG Cylinder Price: जाणून घ्या नव्या वर्षातील गॅस सिलिंडरचे नवे दर
नवीन पद्धतीचा फायदा वयोवृद्धांना आणि ज्यांना आयव्हीआरएस प्रक्रिया समजून घेणं कठीण होतं त्यांना होणार आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भुवनेश्वर इथं आयोजित एका कार्यक्रमातून मिस कॉल सुविधेचा शुभारंभ केला. 8454955555 या क्रमांकावर मिस कॉल दिल्यानंतर गॅस बूकिंग होणार आहे. यावेळी त्यांनी दुसऱ्या टप्प्यातील जागतिक स्तरावरील प्रीमियम ग्रेडचं पेट्रोलसुद्धा सादर केलं. इंडियन ऑइल याची विक्री एक्सपी 100 ब्रँड अतंर्गत करणार आहे.
धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, गॅस एजन्सीज आणि वितरक यांनी हे ठरवायला हवं की एलपीजीची डिलिव्हरी एक दिवस ते काही तासात कशी होईल. एलपीजीमध्ये देशानं मोठी झेप घेतली आहे. 2014 च्या आधी सहा दशकांमध्ये 13 कोटी लोकांना कनेक्शन दिलं होतं. तर गेल्या सहा वर्षात हाच आकडा 30 कोटींपर्यंत पोहोचला आहे.