येमेनमधील युद्धाने 'ममीज'चे अस्तित्व धोक्‍यात 

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मे 2017

वीज व रसायनांअभवी देखभाल करणे अवघड

''आमच्याकडे वीज नसल्याने 'ममीज'चे जतन करण्यासाठी आवश्‍यक यंत्रणा युद्धामुळे उपलब्ध होत नसल्याने हे प्राचीन मृतदेह सडण्यास सुरवात झाली आहे. जंतूसंसर्गही झाला आहे,'' अशी माहिती विद्यापीठाच्या प्राचीव वस्तू विभागाचे प्रमुख अब्देलरहमान अल-गर यांनी दिली.

सन्ना : येमेनमध्ये दुष्काळ व रोगराईला बळी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे; पण तेथे दोन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धाचा फटका प्राचीन मृतदेहांना म्हणजेच 'ममीज'ना बसत आहे. ही गोष्ट विचित्र वाटत असली, तरी युद्धामुळे येथील प्रमुख संग्रहालयांत वीजपुरवठा बंद आहे. त्यामुळे तेथे जतन केलेल्या प्राचीन 'ममीज'ची देखभाल करणे अवघड झाले आहे. तसेच 'ममीज'च्या जतनासाठी आवश्‍यक असणाऱ्या रसायनांचा पुरवठा परदेशातून होत नसल्याने त्या सडण्यास सुरवात झाली आहे. 

येमेनमधील युद्धजन्य स्थितीचा देशातील वर्तमान व भविष्य धोक्‍यात आले आहेच; पण भूतकाळातील मौल्यवान ठेवाही नामशेष होण्याची शक्‍यता आहे. जगात 25 लाख वर्षांपूर्वी आणि इस्लाम धर्माचा उदय होण्याच्या खूप अगोदर अस्तित्वात असलेल्या मूर्तिपूजक संस्कृतीच्या काळातील या 'ममीज' आहेत. येमेनमची राजधानी सन्नामधील मुख्य विद्यापीठाच्या पुरातत्त्वशास्त्र विभागात काचेच्या पेट्यांमध्ये या 'ममीज' शांतपणे पहुडल्या आहेत; मात्र देशातील हैती या सशस्त्र संघटनेचे अस्तित्व संपविण्यासाठी सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील सैन्याने सन्नावर आतापर्यंत हजारो हवाई हल्ले केले आहेत. या संघर्षात दहा हजार नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. या मानवी संघर्षात 'ममीज'चे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. 

''आमच्याकडे वीज नसल्याने 'ममीज'चे जतन करण्यासाठी आवश्‍यक यंत्रणा युद्धामुळे उपलब्ध होत नसल्याने हे प्राचीन मृतदेह सडण्यास सुरवात झाली आहे. जंतूसंसर्गही झाला आहे,'' अशी माहिती विद्यापीठाच्या प्राचीव वस्तू विभागाचे प्रमुख अब्देलरहमान अल-गर यांनी दिली. ''दर सहा महिन्याला 'ममीज'चे निजर्तुंकीकरण्यासाठी विशिष्ट रसायनांची गरज असते; मात्र सध्याच्या अस्थिर राजकीय स्थितीत ती मिळेनाशी झाली आहेत. 'ममीज'मध्ये निर्माण झालेली कीड मारून टाकण्यासाठी निधी व साहित्य देण्याचे आवाहन पुरातनशास्त्रतज्ज्ञांनी विद्यापीठ व सांस्कृतिक मंत्रालयाला केले आहे; पण सन्नाचे विमानतळ बंद केल्याने व तांबडा समुद्रावरील मुख्य बंदरावरील जलवाहतूक रोखल्याने अशा साहित्याची आयात थांबलेली आहे. 

पुरातन ठेवा नष्ट 
येमेनला सातत्याने युद्धाला तोंड द्यावे लागले आहे. आधुनिक युगातील लढाईमुळे देशातील पुरातन सांस्कृतिक ठेवा नष्ट होत आहे. हवाई हल्ल्यांमुळे सन्नामधील जुन्या भागातील मध्ययुगीन काळातील मातीचा मनोरा, मशीद आणि ओटामन किल्ला भुईसपाट झाला आहे. 'अल काईदा'च्या दहशतवाद्यांनी सुफी समाजाचे प्रार्थनास्थळ उडवून दिले. तसेच हैतीच्या ताब्यातील भागात हवाई हल्ले करून तेथे सोलोमन राजवटीत म्हणजे ईसवीसनपूर्व एक हजार वर्षांपासून राहत असलेल्या येमेनी जू समाजाच्या नागरिकांना स्थलांतर करण्यास भाग पाडले आहे. 

Web Title: mummies in danger in war affected yemen