
‘ती’ वारांगणा घ्यायची ग्राहकांचा जीव; संबंधापूर्वी द्यायची...
एका सेक्स वर्करने (prostitute) ग्राहकांना ड्रग्सचा (Drugs) ओव्हरडोज दिला. यामुळे चार जणांचा मृत्यू झाला. चौघांच्या हत्येप्रकरणी या सेक्स वर्करला ३० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सेक्स वर्करने ग्राहकांना लुटण्यासाठी योजनेचा एक भाग म्हणून ड्रग्सचा वापर केला, असे न्यायालयात फिर्यादीने सांगितले. अँजेलिना बारिनी (४३, रा. क्वीन्स, अमेरिका) असे आरोपी महिलेचे नाव आहे.
‘द सन’च्या वृत्तनुसार, २०१९ मध्ये चार पुरुषांना जीवघेणा अंमली पदार्थ दिल्याबद्दल दोषी आढळल्यानंतर न्यायालयाने गेल्या आठवड्यात अँजेलिनाला ३० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. कोर्टाच्या सुनावणीदरम्यान अँजेलिना अनेकदा रडली. सेक्स वर्कर म्हणून काम करणाऱ्या अँजेलिना बारिनी औषध वितरणाच्या दोन गुन्ह्यांमध्ये दोषी ठरविण्यात आले.
हेही वाचा: G-20 शिखर परिषद : इंडोनेशियाने पुतिन, झेलेन्स्कींना केले आमंत्रित
एका प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या शेफच्या मृत्युप्रकरणी अँजेलिना आणि माजी प्रियकराचे नावही आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेफचा मृतदेह चादरीत गुंडाळून डस्टबिनमध्ये फेकण्यात आला होता. या प्रकरणात अँजेलिनाची मोठी बहीण सॅलीने सांगितले की, अँजेलिना (prostitute) शिक्षेविरुद्ध अपील करण्याचा विचार करीत आहे. अँजेलिनाला ड्रग्सची सवय होती. परंतु, तिच्यासोबत गेलेले लोकही संत नव्हते. अँजेलिना कोणाला बळजबरीने घेऊन जात नसे. लोक तिच्यासोबत जात असे आणि ड्रग्स (Drugs) घेतल्यानंतर स्वेच्छेने तिच्यासोबत संबंध बनवायचे.
कोणालातरी सोबत जाण्यास भाग पाडले नाही
अँजेलिनाने डोक्यावर बंदूक ठेवून कोणालातरी तिच्यासोबत जाण्यास भाग पाडले असे नाही. अँजेलिनाला ३० वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेविरोधात वरच्या न्यायालयात जाण्याची संधी आहे, असे अँजेलिनाची मोठी बहीण सॅलीने सांगितले.
Web Title: Murder Prostitute Drugs Four People Died
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..