डेव्हिड हेडलीवर तुरुंगात प्राणघातक हल्ला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

शिकागो - मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्लाप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेला डेव्हिड कोलमन हेडली हा अमेरिकेतील शिकागो येथील तुरुंगात दोन कैद्यांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. 

अतिदक्षता विभागात हेडलीवर उपचार सुरू आहेत. पाकिस्तानी वंशाचा अमेरिकी नागरिक असलेल्या हेडलीवर शिकागोतील तुरुंगात दोन कैद्यांनी आठ जुलै रोजी हल्ला केला होता. या हल्ल्यात हेडली गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला २४ तास निरीक्षणाखाली ठेवले आहे. हेडली हा पाकिस्तान आणि ‘इसिस’साठी काम करत होता, त्यामुळेच हेडलीवर हल्ला केल्याचे हल्लेखोर कैद्यांनी कबूल केले आहे. 

Web Title: murderer attack on david hadley in jail