Muslim League Party : मुस्लीम लीग ठरला सर्वांत मोठा पक्ष

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमधील ३३६ जागांपैकी २६६ जागांसाठी मागील महिन्यात निवडणूक
Muslim League Party
Muslim League Party esakal

इस्लामाबाद : पाकिस्तान मुस्लीम लीग या पक्षाकडे असलेल्या जागांची संख्या १२३ झाली असल्याने हा पक्ष पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमधील सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. आरक्षित जागांचे वितरण इम्रान खान यांचे समर्थन असलेल्या सुन्नी इत्तेहाद कौन्सिलला करण्यास निवडणूक आयोगाने नकार दिल्याने आपोआपच या जागा इतर पक्षांना वाटल्या गेल्या. त्यात नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीगचा फायदा झाला.

Muslim League Party
Health Care News : पीसीओडीची समस्या आहे? मग 'या' हेल्दी स्मूदीजचा आहारात समावेश करा; वजन राहील नियंत्रणात

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमधील ३३६ जागांपैकी २६६ जागांसाठी मागील महिन्यात निवडणूक झाली. उरलेल्या जागांपैकी ६० जागा या महिलांसाठी आणि १० जागा अल्पसंख्याकांसाठी राखीव असतात. निवडणुकीत पक्षांना मिळालेल्या जागांच्या प्रमाणानुसार त्यांना या आरक्षित जागांचे वाटप केले जाते. निवडणुकीत नवाज शरीफ यांच्या पक्षाला ७५ जागा मिळाल्या, तर त्यांना नऊ अपक्षांनी पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांना आरक्षित जागांपैकी २३ जागा मिळाल्या. यामुळे त्यांच्याकडे १०७ जागा मिळाल्या. इम्रान समर्थकांना आरक्षित जागा न मिळाल्याने त्यांच्या वाटेच्या २३ जागांपैकी १६ जागाही याच पक्षाला मिळाल्या. त्यामुळे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे.

Muslim League Party
Yoga For Eye Health : डोळ्यांची दृष्टी मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहेत 'ही' योगासने, जाणून घ्या योग्य पद्धत

अर्थमंत्रिपद औरंगजेब यांच्याकडे?

पाकिस्तानमधील हबिब बँक लिमिटेड या बँकेचे अध्यक्ष महंमद औरंगजेब यांनी आज नवाज शरीफ यांची भेट घेतली. मंत्रिमंडळ स्थापन करण्याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आली असताना औरंगजेब यांनी शरीफ यांची भेट घेतल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या या देशाचे अर्थमंत्रिपद त्यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भुट्टो यांची सुनावणी न्याय्य झाली नव्हती

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी अध्यक्ष झुल्फिकार अली भुट्टो यांना तत्कालीन लष्करशाहीने १९७९ मध्ये फाशी दिली होती, त्यावेळी न्यायालयात न्याय्य पद्धतीने सुनावणी झाली नव्हती, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने आज नोंदविले. भुट्टो हे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे संस्थापक होते. २०११ मध्ये तत्कालीन अध्यक्ष आणि भुट्टो यांचे जावई असिफ अली झरदारी यांनी या सुनावणीचा आढावा घेण्याची विनंती केली होती.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com