ट्रम्प यांचा शांतिप्रस्ताव मुस्लिम राष्ट्रांनी फेटाळला

पीटीआय
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

इस्लामिक सहकार संघटनेने (ओआयसी) सोमवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मध्यपूर्वेसाठीचा शांतता प्रस्ताव नाकारला असून, संघटनेच्या ५७ सदस्य देशांना या प्रस्तावाची अंमलबजावणी न करण्याचे अावाहनही संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

जेद्दा (सौदी अरेबिया) - इस्लामिक सहकार संघटनेने (ओआयसी) सोमवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मध्यपूर्वेसाठीचा शांतता प्रस्ताव नाकारला असून, संघटनेच्या ५७ सदस्य देशांना या प्रस्तावाची अंमलबजावणी न करण्याचे अावाहनही संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगभरातील १.५ अब्जाहून अधिक मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संघटनेने सोमवारी हा प्रस्ताव नाकारला असून, पॅलेस्टाईन जनतेच्या किमान आकांक्षा व कायदेशीर हक्कांची पूर्तता होत नसल्याने आणि शांतता प्रक्रियेच्या संदर्भातील अटींचा विरोधाभास होत असल्याने ही अमेरिकी-इस्रायली योजना नाकारत असल्याचे त्यांनी सांगितले. सौदी अरेबियामधील जेद्दा येथील ‘ओआयसीच्या मुख्यालयात ५७ मुस्लिम देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत ‘सर्व सदस्य देशांनी या योजनेसंदर्भात कोणत्याही प्रकारे किंवा स्वरूपात अंमलबजावणीसाठी अमेरिकन प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करायचे नाही’, असा ठराव मांडला.

कोरोनाचा धुमाकूळ सुरूच; मृतांचा आकडा 361 वर; केरळमध्ये तिसरा रूग्ण 

ट्रम्प यांनी मांडलेल्या प्रस्तावानुसार जेरुसलेम या शहरावर इस्राईलचा ताबा कायम राहील, तर पूर्व जेरुसलेमला पॅलेस्टाईनने राजधानी घोषित करावे. मात्र, ‘ओआयसीने ट्रम्प यांचा प्रस्ताव फेटाळला असून, जोपर्यंत इस्राईल या भूभागावरील आपला ताबा सोडत नाही, तोपर्यंत अशा प्रकारच्या शांतता प्रस्तावांचा कुठलाही फायदा होणार नसल्याचे या वेळी नमूद केले. तसेच ज्या वेळी इस्राईल पवित्र शहर अल-कुडास अल-शरीफ (जेरुसलेम) व कब्जा केलेल्या इतर अरब प्रांतांमधून संपूर्णपणे माघार घेईल तेव्हाच या भागांमध्ये शांतता प्रस्थापित होइल, असेही त्यांनी या वेळी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muslim nations reject Trumps peace proposal