

MV Golden Leo attack
esakal
MEA Statement Shipping Security: 'एमव्ही गोल्डन लिओ' या व्यापारी जहाजावर रशियन क्षेपणास्त्राचा भीषण हल्ला झाला आहे. युक्रेनमधील ओडेसा बंदरातून बाहेर पडणाऱ्या या व्यापारी जहाजावर हा हल्ला झाला. या घटनेमध्ये चार भारतीय खलाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर एक जण गंभीर जखमी झालाय. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.