'या' चित्राची खरेदी तब्बल तीन हजार कोटींत 

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

'या' चित्राची खरेदी तब्बल तीन हजार कोटींना 

लिओनार्दो दा विंचीं यांची अनेक चित्रे प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक कलाकृती म्हणजे 'साल्वाटोर मुंडी'. हे ख्रिस्ताचं चित्र आहे. नोव्हेंबर महिन्यात लिओनार्दो यांच्या या 500 वर्षे जुन्या चित्राचा लिलाव झाला. लिलावाच्या प्रक्रियेत भाग न घेता एका व्यक्तीने फक्त फोनवरून सर्वात उच्च बोली लावून हे चित्र विकत घेतल्याचे समजते. शिवाय या व्यक्तिने हे चित्र सुमारे 3 हजार कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. त्यामुळे ही व्यक्ति नेमकी कोण असावी याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. 

या चित्राच्या किंमतीने 2015 मध्ये झालेल्या पिकासोच्या चित्राच्या लिलावाचे रेकॉर्डही तोडले. लिओनार्दो दा विंचींनी काढलेल्या सगळ्याच चित्रांना आजही जगभरात मोठी मागणी आहे. 

या चित्राचा खरेदीदार सौदीचा एक राजपूत्र असल्याचे 'द न्यूयॉर्क टाइम्स'ने म्हटले आहे. या राजपुत्राचे नाव बादेर बीन मोहम्मद बीन फरहान अल सौद असल्याची माहिती समोर आली आहे. 

असे असले तरी, यापूर्वी या राजपुत्राने कोणतेही दुर्मीळ चित्र खरेदी केल्याची नोंद नाही. या राजपुत्राकडे अमाप संपत्ती असल्याचेही संदर्भ आढळत नाही. म्हणूनच राजपूत्र बादेर यांनी हे चित्र का खरेदी केले हा सगळ्यांच्याच कुतूहलाचा विषय ठरला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Mystery Buyer of a $450 Million Leonardo da Vinci Painting Was a Saudi Prince