Video : ... अन् तिने सभागृहात फाडली डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणाची प्रत!

वृत्तसंस्था
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

हा उल्लेख झाल्याझाल्या पेलोसी यांनी नकारात्मक मान हलवत ट्रम्प यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे सूचित केले. आणि भाषण संपल्यावर भाषणाची प्रत सर्वांसमोर फाडली.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणाची प्रत कनिष्ठ सभागृहाच्या सभापती नॅन्सी पेलोनी यांनी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीतच फाडल्याची नाट्यमय घटना बुधवारी (ता.5) घडली. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ट्रम्प यांनी दोन्ही सभागृहांना उद्देशून आज भाषण केले. या भाषणासाठी जाताना कनिष्ठ सभागृहाच्या (हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह) सभापती नॅन्सी पेलोसी यांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला, मात्र ट्रम्प तसेच पुढे निघून गेले. भाषण संपल्यानंतर पेलोसी यांनी सभागृहातच ट्रम्प यांच्या भाषणाचे कागद सर्वांसमोर फाडले.

- पाटण्यातील 'या' प्रसिद्ध मंदिरातर्फे राम मंदिरासाठी 10 कोटींची देणगी!

ट्रम्प यांच्या धोरणांना विरोध करणाऱ्यांमध्ये पेलोसी या आघाडीवर होत्या ट्रम्प यांच्या विरोधातील माहभियोगाची प्रक्रिया कनिष्ट सभागृहात त्यांनीच गेल्या वर्षी औपचारिकरीत्या सुरू केली होती. ट्रम्प यांनीही नेहमी पेलोसी यांच्यावर टीका केली होती. त्यांनी अनेकदा त्यांचा उल्लेख क्रेझी नॅन्सी असा केला होता. चार महिन्यांपूर्वी व्हाइट हाउसमधील बैठकीतून त्या ट्रम्प यांच्यावर टीका करत बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर प्रथमच दोघे नेते आज समोरासमोर आले होते. 

- मोदींचा 'तो' निर्णय आत्मघातकीच : इम्रान खान

आजच्या भाषणावेळीही पेलोसी यांनी ट्रम्प यांची ओळख करून देतानाही कोणतेही विशेषण न वापरता केवळ अध्यक्ष ट्रम्प असा उल्लेख केला होता, असे वृत्त फॉक्‍स न्यूजने दिले आहे. 
भाषणादरम्यान ट्रम्प यांनी आरोग्य योजनेचा उल्लेख केला. अमेरिकेत येणाऱ्या निर्वासितांना मोफत आरोग्य योजना लागू करण्यासाठी डेमोक्रॅट प्रयत्न करत आहेत, असे ट्रम्प म्हणाले होते. हा उल्लेख झाल्याझाल्या पेलोसी यांनी नकारात्मक मान हलवत ट्रम्प यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे सूचित केले. आणि भाषण संपल्यावर भाषणाची प्रत सर्वांसमोर फाडली.

- CAA : 'एकाही मुस्लिमाला त्रास झाला तर... माईंड इट'; रजनीकांत यांचा इशारा!

''इतर पर्यायांचा विचार करता मी केलेली कृती ही सर्वांत सभ्य कृती होती,'' अशी प्रतिक्रिया पेलोसी यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nancy Pelosi rips up copy of Trump SOTU speech after address