CAA : 'एकाही मुस्लिमाला त्रास झाला तर... माईंड इट'; रजनीकांत यांचा इशारा!

टीम ई-सकाळ
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

सीएए आणि एनआरसीवरून दिशाभूल करण्याचे प्रकार काही लोक करत आहेत. त्याला नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी भुलू नये.

चेन्नई : गेल्या काही महिन्यांपासून देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (NRC) या दोन मुद्द्यांवरून गोंधळ सुरू आहे. त्यावरून या कायद्याला पाठिंबा आणि विरोध करणारे गट निर्माण झाले. यामध्ये सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेजण त्या-त्या गटात विभागले गेले. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

साउथ इंडियन सुपरस्टार रजनीकांत यांनी सीएएला पाठिंबा दर्शविल्यानंतर त्यांनाही अनेकांनी पाठिंबा दर्शविला. तर काहींनी विरोधही केली आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले, 'सीएए हा देशातील कोणत्याही नागरिकाविरोधात असलेला कायदा नाही. तसेच या कायद्यामुळे एकाही भारतीय मुस्लिम व्यक्तीला त्रास होणार नाही. आणि जर असे झाले तर मी सर्वात अगोदर या विरोधात आंदोलन करेन,' असा इशारा त्यांनी दिला आहे.

- मोदींचा 'तो' निर्णय आत्मघातकीच : इम्रान खान

भारतीय मुस्लिमांना या कायद्यामुळे कोणतीही हानी पोहोचणार नाही. ज्यांना पाकिस्तानमध्ये जायचे होते, ते फाळणीवेळीच तिकडे गेले आहेत. त्यामुळे जे सध्या भारतात राहत आहेत, त्या मुस्लिमांनी घाबरण्याचे काही कारण नाही. जर त्यांच्यापैकी एकाही मुस्लिमास त्रास झाला, तर मी सर्वात आधी याचा निषेध करेन, अशी ग्वाही रजनीकांत यांनी चेन्नई येथील निवासस्थानी माध्यमांशी बोलताना दिली. 

- पाटण्यातील 'या' प्रसिद्ध मंदिरातर्फे राम मंदिरासाठी 10 कोटींची देणगी!

देशातील नागरिकांची अचूक माहिती मिळावी यासाठी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही (NPR) हा एक चांगला उपाय असून यामुळे घुसखोरांची माहितीही मिळण्यास मदत होणार आहे. 2011 मध्ये काँग्रेसची सत्ता असताना त्याची अंमलबजावणीस सुरवात झाली. त्यानंतर 2015 ला आणि आताही त्यासंबंधीचे काम सुरू आहे. पण, राष्ट्रीय नागरिकता नोंंदणी (एनआरसी) ची अंमलबजावणी अद्यापही झाली नाही. असेही त्यांनी म्हटले आहे. 

- देशातील सर्वात मोठे बंदर महाराष्ट्रात उभारणार; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी!

... त्यांना दुहेरी नागरिकत्व द्या 

ते पुढे म्हणाले, सीएए आणि एनआरसीवरून दिशाभूल करण्याचे प्रकार काही लोक करत आहेत. त्याला नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी भुलू नये. आंदोलनात सहभागी होण्याअगोदर याविषयीची पूर्ण माहिती जाणून घ्या, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच जे नागरिक श्रीलंकेतून तमिळनाडूमध्ये निर्वासित झाले आहेत, त्यांना दुहेरी नागरिकत्व देण्यात यावे, असी मागणीही त्यांनी यावेळी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Rajinikanth made a statement about Muslim CAA and NRC