पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्‍समध्ये सहभागी होणार

वृत्तसंस्था
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

चीन दौरा आटोपल्यानंतर मोदी 5 ते 7 सप्टेंबर दरम्यान म्यानमार देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. म्यानमारचे अध्यक्ष यू थिन क्वा यांच्या निमंत्रणावरून मोदी जात आहेत. पंतप्रधान मोदी यांचा पहिलाच द्विपक्षीय म्यानमार दौरा आहे

नवी दिल्ली - येत्या 3 ते 5 सप्टेंबर रोजी चीनमध्ये होणाऱ्या ब्रिक्‍स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने आज शियामेन दौऱ्याची माहिती देण्यात आली. डोकलामवरून निर्माण झालेला भारत-चीन यांच्यातील वाद सोमवारी सैन्य माघारीच्या निर्णयानंतर निवळलेला असताना मोदींच्या चीन दौऱ्याची घोषणा महत्त्वाची मानली जात आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, चीन अध्यक्षाच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवव्या ब्रिक्‍स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनच्या फजियान प्रांतातील शियामेन येथे जाणार आहेत. चीन दौरा आटोपल्यानंतर मोदी 5 ते 7 सप्टेंबर दरम्यान म्यानमार देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. म्यानमारचे अध्यक्ष यू थिन क्वा यांच्या निमंत्रणावरून मोदी जात आहेत. पंतप्रधान मोदी यांचा पहिलाच द्विपक्षीय म्यानमार दौरा आहे. यापूर्वी 2014 मध्ये असियान शिखर संमेलनासाठी म्यानमारला गेले होते. या दौऱ्यादरम्यान मोदी स्टेट काऊन्सिलर डॉ आंग सान सू की यांच्यामवेत चर्चा करणार आहेत. याशिवाय अध्यक्ष यू थिन क्वा यांचीही भेट घेणार आहेत. याशिवाय पंतप्रधान यंगून आणि बेगा येथील काही कार्यक्रमात सहभागी होण्याचे नियोजन आहे.

Web Title: narendra modi india brics