NASA layoffs: आता ‘नासा’मध्येही मोठी कर्मचारी कपात; ‘ट्रम्प कार्ड’चा फटका!

NASA layoffs linked to Trump-era policies: ज्यांना कामावरून काढून टाकले जाईल त्यांना प्रथम प्रशासकीय रजेवर पाठवले जाणार आहे.
NASA headquarters where major staff layoffs have been announced amid policy shifts linked to former President Donald Trump's administration.
NASA headquarters where major staff layoffs have been announced amid policy shifts linked to former President Donald Trump's administration. esakal
Updated on

NASA staff reduction: अमेरिकन अंतराळ संस्था ‘NASA’तील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.  तब्बल ३९०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढाले जाणार आहे.  याचे खरं कारण, डोनाल्ड ट्रम्प यांचा तो निर्णय आहे, ज्यामध्ये ते संघीय कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपातीपर्यंत फेडरल सरकारचे बजट नियंत्रित करू इच्छित आहेत. नासाने एक ईमेलमध्ये म्हटले की दुसऱ्या टप्प्यातील राजीनामा सत्रात जवळपास तीन हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

यापूर्वी, नासामध्ये कामावरून काढून टाकण्याच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा पार पडला आहे, ज्यामध्ये ८७० कर्मचाऱ्यांना बाहेरचा मार्ग दाखविण्याची योजना आखण्यात आली होती. आता दुसऱ्या फेरीत, ३ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनाही मेल पाठवून याची माहिती देण्यात आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी नासामध्ये एकूण १८ हजार कर्मचारी काम करत होते, जी संख्या आता १४ हजारांपर्यंत आणली जात आहे. याचा अर्थ असा की अमेरिकन अंतराळ संस्थेला २० टक्के कमी कर्मचाऱ्यांसह काम करावे लागणार आहे. एजन्सीने म्हटले आहे की ज्यांना कामावरून काढून टाकले जाईल त्यांना प्रथम प्रशासकीय रजेवर पाठवले जाईल.

NASA headquarters where major staff layoffs have been announced amid policy shifts linked to former President Donald Trump's administration.
Intel Layoffs 2025 : ‘इंटेल’ने घेतला मोठा निर्णय! यावर्षात तब्बल २४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

नासाचे सध्या स्वतःचे प्रमुखही नाहीत. ही संस्था केवळ कार्यवाहक प्रमुखांकडून संचलित केली जात आहे. यापूर्वी प्रशासनाने टेक अब्जाधीश जेरेड इसाकमन यांची नासाचे प्रमुख म्हणून निवड केली होती, परंतु ते इलॉन मस्क यांच्या जवळ होते, ज्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना ते पटले नव्हते आणि ते शर्यतीतून बाहेर पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com