अभिमानास्पद! भारतीय वंशाच्या भव्या लाल नासाच्या 'चीफ ऑफ स्टाफ'पदी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 February 2021

सर्व भारतीयांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे.

वॉशिंग्टन : भारतीय-अमेरिकन वंशाच्या भव्या लाल यांची काल सोमवारी नॅशनल एरॉनॉटीक्स एँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन (NASA) च्या चीफ ऑफ स्टाफ पदी नियुक्ती केली गेली आहे. भव्या लाल या अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याद्वारे नासामध्ये परिवर्तनासंबंधी (Transition Agency Review Team) स्थापन झालेल्या समीक्षा दलाच्या सदस्य आहेत. तसेच त्या बायडन प्रशासनातील अंतर्गत एजन्सीमध्ये परिवर्तनासाठी आवश्यक कामकाजावर देखरेख करत आहेत.

अमेरिकेची स्पेस एजन्सी नासाने आपल्या एका वक्तव्यात म्हटलं की, भव्या यांच्याकडे इंजिनिअरिंग तसेच स्पेस टेक्नोलॉजीचा प्रदीर्घ अनुभव आहे. भव्या लाल या स्पेस टेक्नोलॉजी तसेच नीती समुदायाच्या सक्रिय सदस्य देखील आहेत. नासाने आपल्या वक्तव्यात म्हटलं की, नासाने एजन्सीतील वरिष्ठ पदांसाठी नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. भव्या लाल एजन्सीमध्ये कार्यवाहक प्रमुख पदी असणार आहेत. फिलीप थॉम्पसन व्हाईट हाऊसदरम्यानचा दुवा म्हणून काम करतील. 

हेही वाचा - म्यानमारमधील सत्तापालटाची अमेरिकेला चिंता; बायडेन यांनी दिली लष्कराला धमकी

भव्या लाल यांच्याकडे 2005 ते 2020 पर्यंतचा इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स एनॅलिसिस सायन्स एँड टेक्नोलॉजी पॉलीसी इन्स्टिट्यूटमध्ये (Science and Technology Policy Institute) संशोधक म्हणून काम केलं आहे. तसेच त्यांना इंजिनिअरिंग आणि स्पेस टेक्नोलॉजीमध्ये प्रदीर्घ अनुभव आहे.  पुढे म्हटलंय की, त्यांनी व्हाईट हाऊस ऑफिस ऑफ सायन्स एँड टेक्नोलॉजी पॉलीसी आणि नॅशनल स्पेस काऊंसिलसाठी स्पेस टेक्नोलॉजीसाठी काम केलं आहे. सोबतच त्यांनी NASA, the Department of Defence आणि intelligence community मध्ये काम केलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NASA names Indian American Bhavya Lal as acting chief of staff