अफगाणिस्तानची प्रसिद्ध झालेली शरणार्थी पोहोचली इटलीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अफगाणिस्तानची प्रसिद्ध झालेली शरणार्थी पोहोचली इटलीत

अफगाणिस्तानची प्रसिद्ध झालेली शरणार्थी पोहोचली इटलीत

रोम : इटली सरकारने गुरुवारी सांगितले की, नॅशनल जीओग्राफिकच्या कव्हर पेजवर दशकांपूर्वी समोर आलेली हिरव्या डोळ्यांची अफगाणी महिला शरबत गुला हिला इटलीत आणले आहे.

तारीख न सांगता एका वक्तव्यामध्ये सांगण्यात आले होते की , ''अफगाणी नागरिक शरबत गुला रोममध्ये पोहचली आहे.'' रोमने तालिबान निंयत्रित देश सोडण्यासाठी मदत करण्यासाठी अफगानिस्तानमध्ये काम करणाऱ्या ना-नफा संस्थेला (Non profit Organzastion)ला सांगितले होते. त्यांनी सांगितले की, ''अफगाण नागरिकांना विस्तृत निर्वासन कार्यक्रम आणि सरकारच्या योजनेचा भाग म्हणून इटलीला आणले आहे.''

हेही वाचा: कोळसा खाणीत भीषण स्फोट; आगीत 52 कामगारांचा होरपळून मृत्यू

1980च्या दशकामध्ये पाकिस्तानमध्ये एका शिबिरामध्ये अमेरिकी फोटोग्राफर स्टीव मॅककरी यांनी काढलेल्या फोटोनंतर गुला ही अफगाणीस्तानमधील सर्वात प्रसिध्द शरणार्थी बनली आणि नॅशनल जिओग्राफिकच्या मॅगजीन्सच्या फ्रंट कव्हरवर तिचा फोटो प्रकाशित केला गेला होता.

गुलाने सांगितले की, ''ती 1979 च्या सोव्हिएत आक्रमणाच्या साधारण 4 ते 5 वर्षांनंतर पहिल्यांदा अनाथ म्हणून पाकिस्तानाला पोहचली. सीमापार शरण घेतलेल्या लाखो अफगाणी नागरिकांपैकी ती एक होती. खोटे ओळखपत्र वापरुन पाकिस्तानमध्ये राहण्याच्या आरोपांतर्गत अटक केल्यानंतर 2016 मध्ये तिला पुन्हा अफगानिस्तानमध्ये परत पाठवले होते.

हेही वाचा: साऊथ आफ्रिकेतून कोरोनाचा नवा व्हेरिएंट, भारतीयांनो सावधान!

सप्टेंबरच्या सुरुवातीला रोमने सांगितले की, ऑगस्ट महिन्यामध्ये तालिबानद्वार सत्ता मिळविल्यानंतर अफगानिस्तामधून साधारण 5000 अफगाणी नागरिकांना बाहेर काढले होते.

इटलीने या महिन्याच्या सुरुवातीस सांगितले होते की,'' त्यांनी अफगाणिस्तानची पहिला महिला मुख्य अभियोजक मारिशा बशीर जेव्हा 9 सप्टेंबला युरपीय देशामध्ये आली होती तेव्हा नागिरकत्व दिले आहे''

loading image
go to top