World Jellyfish Day: ...अशा पद्धतीने साजरा करा जागतिक जेलिफिश डे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Jellyfish Day

World Jellyfish Day: ...अशा पद्धतीने साजरा करा जागतिक जेलिफिश डे

जागतिक जेलिफिश डे, ऐकायला जरी विचित्र असला तरी जगात हा दिवस साजरा करतात. बहुसंख्य जेलीफिश हे मुक्त-पोहणारे सागरी जीव असतात,

जागतिक जेलीफिश दिवस काहींना थोडासा विचित्र वाटत असला तरी, या पृथ्वीवर मानवांपेक्षा लाखो वर्षां पूर्वीपासून असणाऱ्या या प्राण्यांसाठी हा दिवस साजरा करण्यात काय हरकत आहे?

(National Jellyfish Day how to celebrate National Jellyfish day)

हेही वाचा: Apple च्या फॅक्ट्रीत खळबळ; भिंत चढून कामगार पळतायत, काय आहे कारण?

पण हा दिवस साजरा करणे कधीपासून सुरू झाले? बघुया याचा इतिहास :

लोकं म्हणतात जागतिक जेलीफिश डेची अनौपचारिक सुरुवात बहुदा उत्साही सागरी जीवशास्त्रज्ञांच्या गटातून झाली असावी किंवा त्यांच्याकडून ज्यांना हे विचित्र आणि तरीही सुंदर प्राण्यांबद्दल प्रेम आहे.

दक्षिण गोलार्धात, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या जेलीफिश मोठ्या प्रमाणात आढळतात. जागतिक जेलीफिश दिन हा दक्षिण गोलार्धात वसंत ऋतूमध्ये साजरा करतात, कारण या दिवसात उत्तर गोलार्धाच्या समुद्र किनाऱ्यावर जेलीफिश त्यांचे स्थलांतर सुरू करतात, अर्थात या दिवसात आपल्याला किनाऱ्याजवळही जेलिफिश बघायला मिळतात, अनेक पर्यटक या दिवसात समुद्र किनाऱ्यावर गर्दी करतात.

हेही वाचा: Weird Japan : इथे जिवंतपणीच लोक करतात आपल्या अंत्यसंस्कारांची तयारी

जागतिक जेलीफिश दिन कसा साजरा करायचा

साहजिकच, हे जरा विचित्र आहे, पण तरीही मजेशीर आयडिया आहे. अर्थात, जेलीफिश खाऊन किंवा स्पमध्ये त्याची मजा घेत आपण हा दिवस साजरा करू शकत नाही.

जागतिक जेलीफिश दिनाच्या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी या या कल्पना वापरून पहा:

- तुम्ही त्यांची एक झलक बघण्याच्या आशेने समुद्रकिनार्यावर जाऊ शकतात.

- एखाद्या sea acqurium ला भेट देऊ शकतात

- स्कुबा डायव्हिंग हा देखील एक उत्तम पर्याय आहे याने तुम्ही एखाद्या जेली फिशला हातही लावू शकाल

हेही वाचा: Twitter : ब्ल्यू टिकसाठी मोजावे लागणार दरमहा आठ डॉलर