Ukraine Russia War | लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि बरच काही... एका फोन कॉलनंतर युक्रेनच्या मदतीला २८ देश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ukraine vs Russia

लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि बरच काही... एका फोन कॉलनंतर युक्रेनच्या मदतीला २८ देश

रशियाने युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धामुळे जागतिक अशांतता पसरली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत रशियाने पुकारलेल्या युद्धाविरोधात ठराव पारित करण्यात आला. याला एकूण सदस्यांपैकी भारत, चीन आणि संयुक्त अमिरातीने पाठिंबा दर्शवला नाही. या तिनही देशांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. मात्र, आता NATO देशांनी युक्रेनला सहकार्य करण्यावर संमती केली आहे. युक्रेनला तत्काळ लष्करी मदत पोहोचवण्याची तयारी सुरू असून पहिल्या टप्प्यात नेदरलँडने २०० अँटि एअरक्राफ्ट मिसाईल रवाना केले आहेत. (European Union provides military assiastance to Ukraine )

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दोमीर झेलेन्स्की यांनी सेल्फी व्हिडीओ जारी करत आम्हाला पळून जाण्यासाठी गाड्या पाठवू नका, असं म्हटलं. लढण्यासाठी शस्त्र द्या असं म्हणत त्यांनी रशियाविरुद्ध इरादे स्पष्ट केलेत. दरम्यान, फ्रन्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी संपर्क साधला. युरोपीयन युनियनच्या देशांनी युक्रेनच्या पाठिशी उभं राहण्याचं जाहीर केलंय. (Ukraine Russia War)

हेही वाचा: Ukrain Russia War| युक्रेन हल्ल्याचा निषेध करणाऱ्या ठरावावर चीनसह भारत तटस्थ

नेदरलँड्सकडून युक्रेनला 200 अँटि-एअरक्राफ्ट मिसाईल

युक्रेनची राजधानी कीवला रशियन सैन्याने वेढा दिल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. नॉर्थ अटलांटिक ट्रिटीतील देश आता युक्रेनच्या मदतीला धावत असून या देशांकडून मदत मिळू लागली आहे. नेदरलँडने युक्रेनला 200 अँटि-एअरक्राफ्ट क्षेपणास्त्रे दिली आहेत. दरम्यान, कीवमध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये रस्त्यावर युद्ध सुरू आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलंय की, रशियन सैन्य रुग्णालयं आणि नागरी आस्थापनांना लक्ष्य करत आहे. दुसरीकडे चीनने म्हटले की, एखाद्या देशाला आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याचा अधिकार आहे आणि हे युक्रेनलाही लागू होतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडींना वेग आलाय.

हेही वाचा: Ukraine Russia War Live : सत्ता तुमच्या हाती घ्या; पुतिन यांचा युक्रेन लष्कराला सल्ला

फ्रान्सच्या राष्ट्रपतीच्या फोन आणि सूत्र हालली

फ्रन्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दोमीर झेलन्स्की यांना फोन कॉल केला. यावेळी त्यांनी युक्रेनला मदतीचे आश्वासन दिले आहे. युक्रेन या आमच्या मित्र राष्ट्राला शस्त्रास्त्रे आणि लष्करी मदत पाठवली जात आहे, असं त्यांनी म्हटलंय. युक्रेन युद्धविरोधी भूमिकेत असून त्याला सहकार्य करण्याची तयारी फ्रान्सने दाखवली आहे.

अमेरिकेकडून तातडीने 350 दशलक्ष डॉलर्सची मदत

अमेरिकेने युक्रेनला तत्काळ आर्थिक मदत जाहीर केली आहे. व्हाईट हाऊसने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन यांना युक्रेनच्या सुरक्षा आणि संरक्षणासाठी तात्काळ $350 दशलक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. सीएनएनच्या वृत्तानुसार, जो बायडेन आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्यातील चर्चेनंतर ही मदत जाहीर करण्यात आली. दोन्ही नेत्यांमधील 40 मिनिटं चर्चा झाली.

Web Title: Nato Agrees To Provide Military Assistance To Ukraine Over Russia Invasion

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Russia Ukraine Crisis
go to top