पनामाप्रकरणी शरीफ यांची चौकशी होणार

वृत्तसंस्था
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

इस्लामाबाद - पनामा पेपर्सप्रकरणी पंतप्रधान नवाज शरीफ यांना सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला असून, आता त्यांच्या चौकशीसाठी आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग आणि पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ या पक्षांनी या भ्रष्टाचारातील चौकशीसाठीच्या आयोगाबाबत काही अटी शर्ती असल्यास त्या त्वरित पाठवाव्यात, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते इम्रान खान यांनी यासंबंधी याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. इम्रान खान यांनी उद्या (बुधवारी) मोर्चा काढत राजधानी बंद पाडण्याचा इशारा दिला होता, आता त्यांनी यातून माघार घेतली आहे. न्यायालयाने चौकशीसाठी आयोग स्थापणार असल्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनी बंदची हाक मागे घेत आता आनंद साजरा करण्यासाठी एक यात्रा (सेलिब्रेशन रॅली) काढणार असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने बड्या कंपन्यांत शरीफ आणि कुटुंबीयांनी केलेल्या गुंतवणुकीची चौकशी करण्यासाठी आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला असून, याद्वारे पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांचे जवळचे कुटुंबीय यांचीही चौकशी होणार असल्याचे म्हटले आहे.

यानंतर पत्रकारांशी बोलताना खान यांनी उद्या आम्ही मोर्चाऐवजी देवाला धन्यवाद देण्यासाठी आणि आनंद साजरा करण्यासाठी परेड ग्राउंडवर एकत्रित येणार आहोत, अशी माहिती दिली आहे.

सर्व अधिकार देणार
मुख्य न्यायाधीश अन्वर झहीर जमाली यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठाने आज हा निर्णय दिला. चौकशीसाठी नेमलेल्या न्यायाधीशालाही सर्वोच्च न्यायालयाचे सर्व अधिकार देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता गुरुवारी होणार असून न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी रोजच्या रोज घेण्यासही संमती दर्शविली आहे.

Web Title: nawaj sharif inquiry for panama case