नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम अटकेत

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

मरियम शरीफ यांना लाहोरमधून अटक करण्यात आल्याचे पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (पीएमएल-एन) चे प्रवक्त्या मरियम औरंगजेब यांनी सांगितले.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम शरीफ यांना पाकिस्तानच्या नॅशनल अकाऊंटॅबिलीटी ब्युरोने (एनएबी) अटक केली आहे. 

मरियम शरीफ यांना लाहोरमधून अटक करण्यात आल्याचे पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (पीएमएल-एन) चे प्रवक्त्या मरियम औरंगजेब यांनी सांगितले. तर, चौधरी शुगर मिल प्रकरणी मरियम शरीफ यांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. यावरुन मरियम नवाज यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना टोला लगावला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nawaz sharif daughter Maryam Nawaz arrested by NAB in Pakistan