नवाझ शरीफ यांना न्यायालयाचा दिलासा

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

नवाझ शरीफ यांच्यासह त्यांचा भाऊ व पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ आणि इतर काहीजणांचा या हत्याकांडात समावेश असल्याचे बोलले जाते.

लाहोर : कॅनडा येथील धर्मगुरू तहिरुल कादरी यांच्यासह त्यांच्या 14 समर्थकांच्या हत्या केल्याच्या प्रकरणाची सुनावणी घेण्यात यावी यासाठी मागणी करणारी याचिका दहशतवादविरोधी न्यायालयाने फेटाळली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासह त्यांचा भाऊ पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ आणि अन्य काहींचा या गुन्ह्यात समावेश असल्याचे बोलले जाते.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे नवाझ शरीफ यांना दिलासा मिळाला आहे. या गुन्ह्यात शरीफ बंधूंबरोबरच पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान आणि संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांच्यासह इतर 12 उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांवर लाहोर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 2014 मध्ये झालेल्या या घटनेत मृत पावलेल्यांमध्ये दोन महिलांचाही समावेश होता, तर सुमारे 100 हून अधिक जण जखमी झाले होते.

Web Title: nawaz sharif gets relief from court