पनामा पेपरप्रकरणी शरीफ कोर्टात हजर

वृत्तसंस्था
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

सध्या शरीफ यांची पत्नी आजारी असून, त्यांच्यावर लंडन येथे उपचार सुरू आहेत. त्यामुळे शरीफ कुटुंबीयांविरुद्ध अटक वॉरंट काढू नये, अशी मागणी केली होती. मरियम आणि त्यांचे जावई लंडनमध्येच आहेत; परंतु न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावत हजर राहण्याचे वॉरंट बजावले

इस्लामाबाद - पनामा पेपरप्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आज न्यायालयात हजर झाले. या वेळी न्यायालयात हजर न झालेल्या शरीफ यांची कन्या मरियम नवाज शरीफ, हसन, हुसैन आणि कॅप्टन (निवृत्त) सफदार यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावले.

सध्या शरीफ यांची पत्नी आजारी असून, त्यांच्यावर लंडन येथे उपचार सुरू आहेत. त्यामुळे शरीफ कुटुंबीयांविरुद्ध अटक वॉरंट काढू नये, अशी मागणी केली होती. मरियम आणि त्यांचे जावई लंडनमध्येच आहेत; परंतु न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावत हजर राहण्याचे वॉरंट बजावले. या खटल्याची पुढील सुनावणी 9 ऑक्‍टोबरला होणार आहे. तत्पूर्वी शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एनच्या वतीने आज नवाज शरीफ लंडनला जाणार नसल्याचे सांगण्यात आले होते. त्याच वेळी सोमवारी इस्लामाबादच्या न्यायालयाच्या हजर राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले होते. मात्र त्यांचे मुले उपस्थित राहू शकत नाही, असेही नमूद करण्यात आले.

Web Title: nawaz sharif pakistan corruption