India US Defence Deal: अमेरिका भारताला देणार भेदक अस्त्रे; ‘एक्सकॅलिबर’ आणि ‘जॅव्हलिन’ यांची विक्री करण्यास तयार

US Approves Sale of Excalibur and Javelin Systems to India: अमेरिकेने भारताला एक्सकॅलिबर प्रोजेक्टाईल आणि जॅव्हलिन क्षेपणास्त्र विक्रीस मंजुरी दिली असून संरक्षण संबंध अधिक मजबूत होत आहेत. हिंद-प्रशांत क्षेत्रातील स्थैर्यासाठी हा ९० दशलक्ष डॉलरचा व्यवहार महत्त्वपूर्ण असल्याचा दावा अमेरिकी अधिकाऱ्यांचा.
India US Defence Deal

India US Defence Deal

sakal

Updated on

न्यूयॉर्क : भारताला ‘एक्सकॅलिबर प्रोजेक्टाईल’, ‘जॅव्हलिन’ क्षेपणास्त्र यंत्रणा आणि त्याच्याशी संबंधित उपकरणे विक्री करण्यास अमेरिका सरकारने मंजुरी दिली आहे. एकूण नऊ कोटी डॉलरच्या या व्यवहारामुळे भारत-अमेरिका संरक्षण संबंध आणखी मजबूत होण्याबरोबरच हिंद-प्रशांत क्षेत्रात स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठीही हा व्यवहार उपयुक्त ठरेल, असा दावा अमेरिकी अधिकाऱ्यांनी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com