Facebook, Insta बंदचा राग, आंदोलक घरांना लावतायत आग! ५ मंत्र्यांचा राजीनामा, पंतप्रधान देश सोडण्याच्या तयारी

Nepal Gen Z protest against Social Media Ban: नेपाळमध्ये आक्रमक झालेल्या आंदोलकांकडून मंत्र्यांची घरं पेटवली जात आहेत. तरुणांमध्ये संतापाची लाट असून एका पाठोपाठ एक मंत्र्यांकडून राजीनामे दिले जात आहेत.
Nepal Gen Z protest against Social Media Ban

Nepal crisis ministers homes set on fire five resignations after social media ban

Esakal

Updated on

Nepal Gen Z Protest: सोशल मीडिया साइट्सवर बंदी घातल्यानंतर नेपाळमध्ये जेनझींनी केलेल्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागलं. या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज आणि गोळीबारात २१ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय तर ३०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. यानंतर थेट गृहमंत्र्यांनीच राजीनामा दिला आणि नेपाळ सरकारने सोशल मीडियावर घातलेली बंदी हटवली. दरम्यान, आक्रमक झालेल्या आंदोलकांकडून मंत्र्यांची घरं पेटवली जात आहेत. तरुणांमध्ये संतापाची लाट असून एका पाठोपाठ एक मंत्र्यांकडून राजीनामे दिले जात आहेत. आतापर्यंत पाच मंत्र्यांनी राजीनामे दिलेत तर पंतप्रधान केपी ओली यांनी तातडीनं बैठक बोलावलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com