
Air India’s first evacuation flight departs from Kathmandu airport with 123 Indian passengers after Nepal unrest.
esakal
Summary
नेपाळमधील हिंसाचारानंतर काठमांडू विमानतळावर विमानसेवा पुन्हा सुरू झाली असून एअर इंडियाची पहिली फ्लाईट दिल्लीला रवाना झाली.
नागरी उड्डाण मंत्रालयाने एअर इंडिया व इंडिगोला अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी अतिरिक्त फ्लाईट्सचे निर्देश दिले आहेत.
काठमांडू, ललितपूर आणि भक्तपूर जिल्ह्यांत कर्फ्यू शुक्रवारपर्यंत वाढवण्यात आला असून आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे.
Nepal Flight Services Resume : नेपाळमधील नुकत्याच घडलेल्या हिंसाचारानंतर काठमांडू विमानतळावरून विमानसेवा पुन्हा सुरू झाली आहे. बुधवारी एअर इंडियाचे विमान १२३ भारतीय प्रवाशांसह दिल्लीला रवाना झाले. नेपाळमधून भारतीयांना परत आणण्याची प्रक्रिया औपचारिकपणे सुरू झाली आहे.