Nepal Flood Incident
sakal
काठमांडू : सुरुवातीला दीपक तमांग यांना जमिनीला हादरे बसत असल्याचे वाटले. काही क्षणांतच त्यांच्या लक्षात आले की, हा भूकंप नव्हता... भोटेकोशी नदीच्या दिशेने चिखल, दगड आणि पाणी प्रचंड वेगाने येत होते. समोर टिमुरे बाजारातील घरे होती आणि मागे महापुराचा रौद्र प्रवाह... डोंगराच्या दिशेने धावणे हाच एकमेव मार्ग होता...