भगवान रामानंतर गौतम बुद्धांना भारतीय म्हटल्याने भडकला नेपाळ!

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 9 August 2020

सीमा वाद निर्माण झाल्यानंतर नेपाळने आता भारतीय देवी-देवता आणि महापुरुषांवरुन वाद  सुरु केला आहेत.

काटमांडू- सीमा वाद निर्माण झाल्यानंतर नेपाळने आता भारतीय देवी-देवता आणि महापुरुषांवरुन वाद  सुरु केला आहेत. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी भगवान गोतम बुद्ध यांना भारतीय म्हटलं होतं. यावर नेपाळने आपत्ती घेत गौतम बुद्ध नेपाळी असल्याचं म्हटलं आहे. नेपाळमधील अनेक राजकीय नेत्यांनीही एस जयशंकर यांच्या वक्तव्याचा विरोध केला आहे. मात्र, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने वक्तव्य जारी करत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म नेपाळच्या लुंबिनी येथे झाल्याबाबत काहीही शंका नसल्याचं म्हटलं आहे.

काय म्हणाले होते एस. जयशंकर

भारतीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी भारतीय उद्योग परिसंघाच्या (सीआईआई) 75 व्या शिखर संम्मेलनात बोलताना एक वक्तव्य केलं होतं. यात त्यांनी महात्मा गांधी आणि भगवान बुद्ध या दोन महापुरुषांना जग नेहमी आठवणीत ठेवेल असं म्हटलं होतं. भारताताली आतापर्यंतचे सर्वात महान व्यक्ती कोण आहेत असा प्रश्व एस जयशंकर यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ते म्हणाले होते की, एक गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी. त्यांच्या या वक्तव्यावर नेपाळने आक्षेप घेत आपला विरोध दर्शवला आहे. 

नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्याचे वक्तव्य

ऐतिहासिक आणि पौराणिक तथ्यांवर हे सिद्ध होतं की भगवान गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी येथे झाला आहे. लुंबिनी भगवान बुद्धांचे जन्मस्थान असून यूनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषीत केले आहे. 2014 मध्ये नेपाळ दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की नेपाळ असा देश आहे जिथे जागतिक शांतीचा उद्धोष आणि बुद्धांचा जन्म झाला, असं नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितलं आहे. 

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. एक जयशंकर यांनी सीआईआईच्या कार्यक्रमात बौद्धांच्या वारशासंदर्भात भाष्य केलं होतं. भगवान गौतम बुद्धांचा जन्म नेपाळच्या लुंबिनी येथे झाला, यात कसलीही शंका नाही, असं मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

नेपाळचे माजी पंतप्रधान आणि सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे परराष्ट्र विभागाचे प्रमुख माधव कुमार यांनी एस जयशंकर यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. तसेच भारत सरकारला याची दखल घेण्यास सांगितलं आहे. जयशंकर यांच्या वक्तव्याने दु:ख झाल्याचं ते म्हणाले आहेत. नेपाळमधील अनेक नेत्यांनी एस जयशंकर यांच्या वक्तव्यावर आपत्ती घेतली आहे.

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nepal objects comments on gautam bhudha was indian