Nepal Plane Crash : नेपाळमधील विमान दुर्घटनेत ५ भारतीयांसह सर्वच ७२ जणांचा दुर्दैवी अंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nepal plane crashed  in pokhra 72 died including 5 indians latest big update

Nepal Plane Crash : नेपाळमधील विमान दुर्घटनेत ५ भारतीयांसह सर्वच ७२ जणांचा दुर्दैवी अंत

Nepal Plane Crash : नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्यापूर्वी रविवारी 72 आसनी प्रवासी विमान कोसळले. या विमान अपघातात सर्व 72 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर विमानतळ बंद करण्यात आला असून बचावकार्य सुरु आहे.

त्याचवेळी पोखरा विमानतळावर प्रवासी विमान अपघातानंतर नेपाळ सरकारने मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक बोलावली आहे.खराब हवामानामुळे विमान डोंगराला धडकून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान नेपाळ लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 44 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.या विमानाने आज सकाळी साडेदहा वाजता त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं होतं.

हेही वाचा: Chitra Wagh : "उर्फी जावेद भाजपमध्ये आली तर..." ; चित्रा वाघ पत्रकारांच्या प्रश्नावर भडकल्या

विमानात पाच भारतीय

काठमांडू पोस्टने यति एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांच्या माध्यमातून वृत्त दिले की, अपघात झालेल्या यति एअरलाइन्सच्या विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान हे विमान कोसळले.

नेपाळमधील पोखरा विमानतळावर झालेल्या विमान अपघातात काठमांडू, नेपाळमधील भारतीय दूतावासाने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. विमानात 5 भारतीयांसह 68 प्रवासी होते.

हेही वाचा: Nepal: नेपाळ विमान दुर्घटनेत ३२ जणांचा मृत्यू; बचाव कार्य सुरू

44 मृतदेह बाहेर काढले

काठमांडू ते पोखरा या मार्गावर यती एअरलाइन्सच्या ANC ATR 72 विमानाच्या अपघातानंतर नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांचे काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.

आतापर्यंत एकूण 44 मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती नेपाळ लष्कराच्या प्रवक्त्याने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात 5 भारतीय आणि 4 रशियन नागरिक होते. विमानात नेपाळचे 53 प्रवासी होते.

टॅग्स :nepal