Chitra Wagh : "उर्फी जावेद भाजपमध्ये आली तर..." ; चित्रा वाघ पत्रकारांच्या प्रश्नावर भडकल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chitra Wagh

Chitra Wagh : "उर्फी जावेद भाजपमध्ये आली तर..." ; चित्रा वाघ पत्रकारांच्या प्रश्नावर भडकल्या

Chitra Wagh : अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. ती अनेकदा तिच्या नवीन ड्रेसमध्ये मुंबईच्या रस्त्यांवर फोटोग्राफर्सना पोज देते, ज्यासाठी तिला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलला सामोरे जावे लागते. मात्र भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या फॅशनवर आक्षेप घेतला. (Chitra Wagh on Uorfi Javed)

चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर अभिनेत्री उर्फी जावेदला शनिवारी मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. त्यामुळे उर्फीने पुन्हा चित्रा वाघ यांच्यावर हल्ला केला होता. 

दरम्यान चित्रा वाघ यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेतली. त्यांनी उर्फीवर टीका केली. उडघी नागडी फिरू नको कपडे घालून फिर, ही आमची मागणी आहे. मला कोण काय बोलते, याचा फरक पडत नाही, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

हेही वाचा: Ratnagiri News : रत्नागिरी जिल्हा नियोज समितीचा १८ टक्केच निधी खर्च

तुमच्यामुळे उर्फीला प्रसिद्धी मिळाली, असा प्रश्न चित्रा वाघ यांना विचारला असता त्या पत्रकारांवर भडकल्या. त्या म्हणाल्या, "तुमच्या बायकोला घरी जाऊन विचारा, तुला हे पसंत आहे का? (उर्फी फॅशन), तुमच्या मुलांना विचारा. मग विचार करा. माझ्यामुळे ती प्रसिद्ध होते म्हणून मी बोलायचे नाही तर हे मला मान्य नाही."

हेही वाचा: Ajit Pawar : 'दोनच अपत्यावर थांबा, पलटण वाढवू नका'; अजित पवारांचा महिलांना सल्ला

उर्फी जावेद भाजपमध्ये आली तर असा प्रश्न चित्रा वाघ यांना विचारला. चित्रा वाघ म्हणाल्या, "तुम्ही असं कसं काय बोलू शकता. असल्या नंगट लोकांसाठी भाजपमध्ये जागा नाही. भाजपामध्ये लोक एका ध्येयासाठी काम करतात. मजाक बनवून ठेऊ नका. आमच्या पक्षाबद्दल बोलायची काही गरज नाही. हे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते. माझ्यावर टीका करा, १०० प्रश्न विचारा, तो तुमचा अधिकार आहे. माझ्या पक्षावर, माझ्या परिवारावर ज्याप्रमाणे बोलले जाते ते पूर्णपणे चुकीचे आहे. माझ्या मुलांची फोटो व्हायरल केली, याची काय गरज होती."

हेही वाचा: Sena Divas : आज भारताचा 75 वा सेना दिवस, जाणून घ्या याचे मूळ!

टॅग्स :Bjpaurangabad