
Nepal Army Chief Ashok Raj Sigdel
esakal
नेपाळमधील राजकीय वातावरण सध्या प्रचंड अस्थिर आहे. गेल्या दोन दिवसांत तरुणांनी केलेल्या हिंसक आंदोलनाने देशाला हादरवून सोडले आहे. पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. यामागील कारण आहे जेन-झेडच्या नेतृत्वाखालील आंदोलन, ज्याने अवघ्या 48 तासांत देशाची राजकीय व्यवस्था कोलमडून टाकली.
संसद, सर्वोच्च न्यायालय आणि अनेक राजकीय नेत्यांच्या निवासस्थानांना आगीच्या ज्वाळांनी ग्रासले. या अराजकतेत 19 जणांचा मृत्यू झाला, तर 500 हून अधिक जखमी झाले. आता नेपाळची कमान लष्करप्रमुख अशोक राज सिग्देल यांच्याकडे आहे. कोण आहेत हे सिग्देल, आणि नेपाळचे भविष्य आता कुठल्या दिशेने जाईल?