royal nepal massacre
esakal
Nepal Royal Massacre: कशी संपली होती नेपाळची राजेशाही ? राजकुमाराने राजा-राणीसह राजघराण्यातील 9 जणांची केली होती हत्या अन्..
Nepal Royal Family: नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध तरुणांनी कालपासून रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाने हिंसक रूप घेतले असून आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ४०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या हिंसक आंदोलनानंतर नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी अखेर राजीनामा दिला आहे, ज्यामुळे नेपाळमध्ये अराजक स्थिती निर्माण झाली आहे.
आंदोलनकर्त्यांनी संसद भवन ताब्यात घेतले असून संसदेच्या इमारतीला आग लावली आहे. तसेच नेपाळच्या अर्थ मंत्र्यांनाही मारहाण करण्यात आली आहे. देशातील तरुणांचा वाढता रोष पाहता नेपाळच्या सैन्याने पंतप्रधान ओली यांना देश सोडण्याचा सल्ला दिला आहे.
नेपाळमध्ये अराजकता ही पहिल्यांदा घडलेली नाही.
तिथल्या युवराजाने एकदा राजघराण्यातील नऊ जणांची गोळ्या झाडून हत्या केली होती. काय घडलं होतं नेमकं ?
1 जून 2001 मध्ये नेपाळचे युवराज दीपेंद्र शाह यांनी त्यांच्या राजघराण्यातील नऊ जणांची गोळ्या झाडून हत्या केली होती. दीपेंद्रचे वडील राजा बिरेंद्र, आई राणी ऐश्वर्या आणि राजघराण्यातील इतर 7 सदस्यांचा मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये समावेश होता. कुटुंबीयांची हत्या केल्यानंतर दीपेंद्रने स्वत:वरही गोळी झाडली.

