

Nepal Tibet flood leaves 21 Indian devotees stranded, but a sari helps rescue
esakal
Nepal Tibet Border Flash Flood: 21 Indian Devotees Survive : नेपाळ-तिबेट सीमेवरील प्रलयादरम्यान एक अनोख्या घटनेत भारतातील २१ भाविकांचे चमत्कारिकपणे जीव वाचल्याचे समोर आले आहे. रस्त्यावर अचानक पुराचे पाणी वेगाने शिरले आणि डोंगरावरून दगड-मातीचे लोट खाली येऊ लागल्याने चेन्नईतील भाविकांच्या एका गटावर जीवघेणे संकट ओढावले. बस सोडून डोंगराच्या दिशेने धाव घेतलेल्या २१ जणांनी तब्बल दीड दिवस मदतीची प्रतीक्षा केली. या काळात एका महिलेने आपली साडी खाली सोडून दिली आणि त्याच साडीच्या मदतीने अडकलेल्या भाविकांना वर खेचण्यात आले. त्यामुळे ही साडीच त्यांच्या जीविताची ‘जीवनदायिनी’ ठरली.