Nepal Youth Protests Turn Violent
esakal
Nepal Youth Protests: सोमवारी नेपाळमधील तरुणांनी सोशल मीडियावर बंदी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध हिंसक आंदोलन उभारले होतं. यावेळी काही तरुणांनी संसदेत घुसण्याचाही प्रयत्न केला होता. या हिंसाचारात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे सरकारने सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली आहे. तरीही नेपाळमध्ये आंदोलन सुरुच आहे.