सिंगापूरच्या राष्ट्रपतींकडून नव्या भारतीय संघटनेचा मुहूर्त

सिंगापूरच्या राष्ट्रपती मदाम हलीम याकूब यांच्या हस्ते या संघटनेचे लोकार्पण करण्यात आले.
FSIO
FSIOSakal

सिंगापूर : सिंगापूरच्या राष्ट्रपतींकडून नव्या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. मागच्या आठवड्यात सिंगापूरमध्ये व्यावसाय आणि समुदायाचे नेत्यांची बैठक झाली होती. त्यानंतर तेथे एका नव्या संघटनेने जन्म घेतला आहे. Federation Of Singapore India Organization (FSIO) असं या संघटनेचं नाव असून सिंगापूरमधील भारतीय वाणिज्य आणि व्यापार संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने याचा शुभारंभ करण्यात आला आहे. सिंगापूरच्या राष्ट्रपती मदाम हलीम याकूब यांच्या हस्ते या संघटनेचे लोकार्पण करण्यात आले.

(New Indian Organization Launched in Singapore)

FSIO
'मी बाळासाहेबांना...', धर्मवीर सुरू असतानाच उद्धव ठाकरे उठले आणि निघाले!

या संघटनेची घोषणा ऑक्टोबर २०२१ मध्ये करण्यात आली होती. या संघटनेमध्ये २६ संस्थांना एकत्रित करण्यात येणार असून भारतीय समुदायाला एकत्र करण्यासाठी आणि सिंगापूरमधील मुद्द्यांच्या बाबतीत लढण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. फक्त भारतीयांना एकत्र करून त्यांना मदत करणे एवढाच उद्देश या संघटनेचा नसून भारतीयांसाठी सामाजिक आणि शैक्षणिक अशा दोन्ही उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या संघटने अंतर्गत वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या तरूणांना एकत्र करण्यात येणार आहे. त्यांचे कौशल्य आणि कल्पना वापरून संघटनेला वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

FSIO
'उतराला लागलेली गाडी आणि...' फडणवीसांची सभा संपताच राऊतांचं ट्वीट

दरम्यान FSIO सिंगापूरमधील जास्तीत जास्त लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करेल. स्थानिक किंवा परदेशी लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. नोकऱ्या, कौटुंबिक समस्या, भारतात परत जाण्यासाठी लागणारी मदत किंवा भारतात अडकलेले तसेच काम किंवा अभ्यास करण्यासाठी सिंगापूरला परत येऊ न शकलेल्यांना विविध आव्हाने आणि समस्यांचा सामना करावा लागणाऱ्या लोकांना विशेष मदत केली जाणार आहे.

तसेच भारतीय नागरिक सिंगापूरमध्ये जेव्हा पहिल्यांदा येतात त्यावेळी त्यांनी स्थानिक लोकांकडून लुटले जाते, पैसे वसूल केले जातात, अशा परिस्थितीत FSIO कडून मदत करण्यात येणार असल्याचं सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com