धक्कादायक! चीनच्या लॅबमध्ये कोरोनापेक्षाही धोकादायक व्हायरस; तांदूळ आणि कापसामुळे खुलासा

corona_virus
corona_virus

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा एकदा जगभरात थैमान घालण्यास सुरवात केली आहे. असे असताना आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोना विषाणूंसारखा आणखी एक धोकादायक विषाणू लवकरच जगाला त्रास देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संशोधकांच्या एका टीमने असा दावा केला आहे की, चीनच्या (China) वुहानमध्ये (Wuhan) अनेक प्रकारचे आणि अधिक धोकादायक विषाणू अजूनही अस्तित्वात आहेत. वुहान आणि चीनच्या इतर शहरांतील कृषी प्रयोगशाळांमधील (Agricultural Labs) तांदूळ आणि कापसाच्या जेनेटिक डाटाच्या आधारे वैज्ञानिकांनी हा दावा केला आहे.

जगापुढे आणकी एक मोठी समस्या
एकीकडे जगभरातील लोक कोरोनाच्या कहरामुळे त्रस्त झाले आहेत, अशा परिस्थितीत वैज्ञानिकांनी केलेला दावा खरा ठरला, तर चीन जगातील सर्वच देशांना आणखी एक समस्येत ढकलू शकते. हे विषाणू अधिक धोकादायक सिद्ध होऊ शकतात, कारण कृषी प्रयोगशाळांमध्ये वैद्यकीय संशोधन केंद्र किंवा विषाणू विज्ञान प्रयोगशाळांसारखी मजबूत सुरक्षा व्यवस्था नसते.

चीनमध्ये अनेक धोकादायक व्हायरसचे अस्तित्त्व
हे संशोधन ArXiv नावाच्या प्रीप्रिंट सर्व्हरमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, वुहान आणि चीनच्या इतर शहरांमधील कृषी प्रयोगशाळांमध्ये मानवाला हानी पोहचविणारे बरेच धोकादायक व्हायरस आहेत. जर आताच यावर नियंत्रण आणले नाही, तर जगातील सर्वांसाठी ही आणखी एक मोठी समस्या ठरू शकते.

तांदूळ आणि कापसाचे जेनेटिक सिक्वेन्स
ArXiv वर प्रकाशित करण्यात आलेल्या या रिपोर्टला अद्याप कोणत्याही अॅकॅडमिक जर्नल किंवा तज्ज्ञांकडून मान्यता मिळालेली नाही. मात्र यातील संशोधन हे आश्चर्याचा धक्का देणारं आहे. वैज्ञानिकांनी कृषी प्रयोगशाळांमध्ये असलेल्या तांदूळ आणि कापसाच्या जेनेटिक सिक्वेन्सच्या 2017 आणि 2020 दरम्यानचा डेटा घेतला आहे. हा डेटा इथल्या नवीन व्हायरसचा एक प्रकारचा कोषच आहे. हा डेटा MERS आणि SARS शी संबंधित आहे. 

चीन सरकारने आरोप फेटाळले
धक्कादायक गोष्ट म्हणजे हा सर्व जेनेटिक डेटा वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (Wuhan Institute of Virology) या लॅबमधून घेतला होता. या लॅबमधूनच कोरोना जगभरात पसरला अशी शंका अजूनही व्यक्त केली जाते. चीनने सातत्यानं हे आरोप फेटाळले असले तरी जगभरातील संशोधकांकडून या लॅबवर संशय व्यक्त केला जातो.

- जगभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com