New York Times Vs AI : ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दंड थोपटले; ‘ओपनएआय’, ‘मायक्रोसॉफ्ट’विरोधात न्यायालयात धाव

या कंपन्यांनी ‘एआय चॅटबॉट’च्या माध्यमातून ‘टाइम्स’ने केलेल्या शोध पत्रकारितेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला असून याद्वारेच अन्य ‘एआय’ उत्पादने बाजारात आणली असा आरोप करण्यात आला आहे.
New York Times Vs AI
New York Times Vs AIeSakal

New York Times : ‘दि न्यूयॉर्क टाइम्स’ या दैनिकाने ‘चॅटजीपीटी’ची निर्मिती करणाऱ्या ‘ओपनएआय’ आणि ‘मायक्रोसॉफ्ट’ या दोन कंपन्यांवर अमेरिकेच्या न्यायालयामध्ये खटला भरला आहे. या कंपन्यांनी त्यांच्या ‘एआय मॉडेल्स’ला प्रशिक्षण देण्यासाठी दैनिकातील लेखांचा वापर केला होता पण त्यासाठी कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी मात्र घेण्यात आली नव्हती, असा दावा माध्यम संस्थेकडून करण्यात आली आहे.

या कंपन्यांनी ‘एआय चॅटबॉट’च्या (AI Chatbot) माध्यमातून ‘टाइम्स’ने केलेल्या शोध पत्रकारितेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला असून याद्वारेच अन्य ‘एआय’ उत्पादने बाजारात आणली. यासाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती तसेच त्याचा मोबदला देखील करण्यात आला नव्हता, असे माध्यम समूहाने म्हटले आहे. (New York Times Case)

जर्मनीच्या ‘अॅक्सेल स्प्रिंगर’ आणि ‘असोसिएटेड प्रेस’ या माध्यम संस्थांनी माहिती आणि डेटाच्या अनुषंगाने ‘ओपन एआय’सोबत (Open AI) करार केला असताना ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने मात्र त्याच्याविरोधात भूमिका घेतली आहे. ‘चॅटजीपीटी’ (ChatGPT) आणि मायक्रोसॉफ्टच्या ‘कोपायलट’ (आधी बिंग) ला प्रशिक्षित करण्यासाठी एआय मॉडेल्सचा वापर करण्यात आला होता.

New York Times Vs AI
Humane AI Pin : तुमच्या हाताची होणार स्क्रीन, खिशाला अडकवता येणार कम्प्युटर; पुढील वर्षीपासून मिळणार डिलिव्हरी

त्यासाठी इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीचा आधार घेण्यात आला होता. विशेष म्हणजे यासाठी दोन्ही कंपन्यांनी कसल्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती. ‘टाइम्स’च्या डेटाचा (Times Data) वापर करून त्याद्वारे एआय उत्पादने तयार करण्यात आल्याने गुणवत्तापूर्ण वार्तांकनाला मोठा धोका निर्माण झाल्याचा दावा माध्यम संस्थेकडून करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com