esakal | नायजेरियात भारतीय Koo चे जंगी स्वागत; ट्विटरचा पत्ता कट
sakal

बोलून बातमी शोधा

koo

मागील आठवड्यात अमेरिकन मायक्रोब्लॉगिग प्लॅटफॉर्म ट्विटरवर नायजेरियन सरकारने कायमस्वरुपी बंदी आणली आहे.

नायजेरियात भारतीय Koo चे जंगी स्वागत; ट्विटरचा पत्ता कट

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नायजेरिया- मागील आठवड्यात अमेरिकन मायक्रोब्लॉगिग प्लॅटफॉर्म ट्विटरवर नायजेरियन सरकारने कायमस्वरुपी बंदी आणली आहे. तसेच सरकारने भारतीय Koo चे नायजेरियात स्वागत केले आहे. Koo नेही याचा फायदा घेत देशात मायक्रोब्लॉगिग प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देणार असल्याचं जाहीर केलंय. तसेच देशाच्या आवश्यकतेनुसार आणखी काही भाषा उपलब्ध करणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे Koo ट्विटरला पर्याय ठरताना दिसत आहे. (Nigerian government has joined India made rival Koo Twitter ban)

नायजेरियाने ट्विटरवर बंदी का आणली?

ट्विटरने गेल्या काही दिवसात नायजेरियन अध्यक्ष मुहाम्मदू बुहारी (Muhammadu Buhari) यांचे ट्विट्स नियमांचे भंग केल्याप्रकरणी काढून टाकले होते. फेक न्यूज पसरवत असल्याचे कारण देत ट्विटरने त्यांचे ट्विट डिलिट केले होते. याप्रकरणी मुहाम्मदू बुहारी यांनी ट्विटरवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला. ट्विटरवरील बंदीनंतर नायजेरीयातील काही नागरिकांनी याला विरोध केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि खासगीपणावर हा घाला असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. ट्विटरने म्हटलंय की, 'ट्विटरवरील बंदीबाबत आम्ही गंभीर दखल घेतली आहे. आधुनिक जगात ओपन इंटरनेट माणसाचा आवश्यक अधिकार आहे. नागजेरियातील ट्विटर युजर्सचा अॅक्सेस पुन्हा रिस्टोर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु.'

हेही वाचा: काँग्रेसची 'चौकट' मोडली; राहुल गांधींसमोर काय आहे संकट?

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नायजेरिया सरकारने उचललेल्या पाऊलाचे स्वागत केले आहे. इतर देशांनीही याचे अनुकरण करावे, असं ते म्हणाले आहेत. चूक आणि वाईट ठरवणारे ते कोण आहे, सर्वांना व्यक्त होण्याचा अधिकार आहे. सर्वांचा आवाज ऐकला गेला पाहिजे. आणखी काही देशांनी फेसबुक आणि ट्विटरवर बंदी आणावी, असं ट्रम्प म्हणाले आहेत. अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचे अनेक ट्विट बंद केले होते. शिवाय त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर बंदी आणली आहे.

हेही वाचा: अल्झायमरवरील औषधाला अमेरिकेत मंजुरी, भारतात औषध कधी येणार?

Koo साठी संधी?

नायजेरियाने ट्विटरवर बंदी आणल्याने मायक्रोब्लॉगिग प्लॅटफॉर्म Koo ला संधी मिळाली आहे. Koo ट्विटरला पर्याय म्हणून समोर येत आहे. भारतामध्येही Koo ला हातपाय पसरवण्यास वाव आहे. सध्या केंद्र सरकार आणि ट्विटर इंडियामध्ये तणावाची स्थिती आहे. केंद्राने ट्विटरला काही ट्विट्स डिलिट करण्यास आणि काही अकाऊंट बॅन करण्यास सांगितलं होतं. पण, ट्विटरने याला नकार दिला होता. शिवाय केंद्राने नवे आयटी नियम आणले आहेत. ज्यांचे सरसकट पालन करण्यास ट्विटर तयार नाही. दुसरीकडे, Koo मधील गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे येत्या काळात Koo ट्विटरला टक्कर देऊ शकते.