नाईलचे अस्तित्व तीन कोटी वर्षांपासून

nile river
nile river

ह्यूस्टन - जगातील प्राचीन समजल्या जाणाऱ्या इजिप्तच्या संस्कृतीत नाईल नदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आफ्रिका खंडातून वाहणारी आणि जगातील सर्वाधिक लांब असणाऱ्या नाईल नदीचे अस्तित्व पूर्वी गृहीत धरल्यापेक्षा सहा पटीने जास्त काळापासून आहे, असा निष्कर्ष एका संशोधनातून काढण्यात आला आहे. नाईल नदीचा उगम तीन कोटी वर्षांपूर्वी झाला असल्याचा दावा भूगर्भशास्त्रज्ञांनी केला आहे.

‘नेचर जिओसायन्स’ या नियतकालिकामध्ये या विषयावर लेख प्रसिद्ध झाला आहे. अमेरिकेतील ऑस्टिन येथील टेक्‍सास विद्यापीठातील संशोधकांनी नाईलबद्दल संशोधन केले आहे. दीर्घायुषी नद्यांच्या प्रवाहात वेळोवेळी बदल होत असतो; पण नाईल नदीचा प्रवाह स्थिर राहिला आहे, हे एक न उलगडलेले कोडे आहे. नाईलचा उगम कधी झाला आणि ती प्रदीर्घ काळ तिचे अस्तित्व कायम कसे राहिले, हा महत्त्वाचा प्रश्‍न असून, त्यावरील आमचे उत्तर उत्कंठावर्धक आहे, असे इटलीमधील रोमा ट्री विद्यापीठातील भूगर्भशास्त्रज्ञ क्‍याऊडिओ फॅसेन्ना यांनी सांगितले. नाईलच्या स्थिरावस्थेबद्दल प्रा. फेसेन्ना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नदीच्या इतिहासाचा शोध घेतला. यासाठी त्यांनी इथिओपियाच्या डोंगराळ प्रदेशातील प्राचीन ज्वालामुखीजन्य खडकांचे पृथक्करण करण्यात आले.

इथिओपियन डोंगररांगांची निर्मिती व वाढ वेगाने झाल्यानंतर त्यांची उंची लाखो वर्षे कायम राहिली आहे. इथिओपियन पठाराच्या भौगोलिक रचनेची निर्मिती तीन कोटी वर्षांपूर्वी झाल्याचे ज्ञात आहे, अशी माहिती लेखाचे लेखक आणि टेक्‍सास विद्यापीठाचे भूभौतिकतज्ज्ञ थ्रोस्टेन बेकर यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com