9 वर्षीय भावाने केली बहिणीची गोळी घालून हत्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 मार्च 2018

मृत मुलीने व्हिडिओ गेम कंट्रोलर देण्यास नकार दिल्याने चिडलेल्या मुलाने सरळ तिच्या डोक्‍यात पाठीमागून गोळी घातली. जखमी मुलीस तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र थेट डोक्‍यातच गोळी लागल्याने ती वाचू शकली नाही

वॉशिंग्टन - अमेरिकेतील मिसिसिपी स्टेटमध्ये व्हिडिओ गेम कंट्रोलरवरुन झालेल्या या भांडणामध्ये एका नऊ वर्षांच्या मुलाने त्याच्या 13 वर्षांच्या मोठ्या बहिणीस गोळ्या घालून ठार केले. येथील स्थानिक माध्यमांनी यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

मृत मुलीने व्हिडिओ गेम कंट्रोलर देण्यास नकार दिल्याने चिडलेल्या मुलाने सरळ तिच्या डोक्‍यात पाठीमागून गोळी घातली. जखमी मुलीस तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र थेट डोक्‍यातच गोळी लागल्याने ती वाचू शकली नाही.

दरम्यान, इतक्‍या लहान मुलाकडे शस्त्र कसे आले, याची आता चौकशी करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine-year-old boy shoots sister dead over video game controller