फरार नीरव मोदीच्या भावानेही केली फसवणूक; 26 लाख डॉलरचे हिरे चोरी केल्याचा आरोप

सकाळ ऑनलाईन
Sunday, 20 December 2020

पंजाब नॅशनल बँक (PNB Scam) घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदी (Nirav Modi) याचा भाऊ नेहल मोदी (Nehal Modi) याच्याविरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे

वॉशिंग्टन- पंजाब नॅशनल बँक (PNB Scam) घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदी (Nirav Modi) याचा भाऊ नेहल मोदी (Nehal Modi) याच्याविरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. नेहल मोदीने मेनहॅटनमध्ये एका मोठ्या हिरे कंपनीसोबत एका मल्टी लेअर्स स्कीमद्वारे 19 कोटींपेक्षा अधिक रुपयांची हेराफेरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिऱ्याच्या या कंपनीने नेहलवर 2.6 मिलियन डॉलरपेक्षा अधिक मूल्याचे हिरे चोरी केल्याचा आरोप करत फर्स्ट डिग्री अंतर्गत सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले आहेत. अमेरिकी कायद्यात 1 मिलियन डॉलरपेक्षा अधिकचा फसवणुकीचा आरोप करण्यात आला असल्यास फर्स्ट डिग्री अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. 

नाराज नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर काँग्रेसमध्ये बदल सुरु; 2 प्रदेश प्रमुखांचा...

मेनहॅटनची हिरे कंपनी एलएलडी कोर्टात गेली असल्याने आता नेहल मोदी विरोधात न्यूयॉर्कच्या सुप्रीम कोर्टात खटला चालणार आहे. नेहल मोदी संबधात डिस्ट्रिक्ट अॅटोर्नीने सांगितलं की, नेहलने 2015 मध्ये एलएलडी डायमंड्स यूएसएशी संपर्क केला होता. त्याने खोटे प्रझेंटेशन करण्यासाठी एलएलडीकडून 2.6 मिलियन डॉलरचे हिरे घेतले. नेहल मोदीने सुरुवातीला कंपनीकडून 8,00,000 डॉलर किमतीचे हिरे घेतले. निहलने हे हिरे कॉस्टको होलसेल कॉर्पोरेशनला दाखवण्याचा दावा एलएलडी कंपनीकडे केला होता. 

कॉस्टको आपल्यासोबत जुडणाऱ्या ग्राहकांना कमीतकमी किमतीत हिरे विकते. त्यानंतर निहल मोदीने दावा केला की, कॉस्टको एलएलडीचे हिरे घेण्यास तयार झाली आहे. त्यानंतर एलएलडीकडून आणखी काही हिरे खरेदी करण्यात आले. याकाळात एलएलडी कंपनीला काही रक्कम देण्यात आली, पण ती मूळ किंमतीच्या खूप कमी होती. त्यानंतर एलएलडीला फसवणुकीचा पत्ता लागला, तोपर्यंत नेहल मोदीने सर्व हिऱ्यांना विकून पैस खर्च केले होते. परिणामी एलएलडीने मेनहॅटन प्रोसीक्यूटर ऑफीसमध्ये तक्रार दाखल केली.  

अर्थव्यवस्थेचं मोडलंय कंबरडं; मोदी सरकारची अर्थनीती सफशेल अयशस्वी ठरलीय का?

दरम्यान,  पंजाब नॅशनल बँकेत  (PNB Scam) 2 अब्ज अमेरिकी डॉलरच्या फसवणुकीप्रकरणी हिरे व्यापारी नीरव मोदी याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आलं आहे. विजय मल्ल्यानंतर निरव मोदी दुसरा फरार आर्थिक गुन्हेगार आहे. यासंबंधी मागिल वर्षी एक अधिनियम बनवण्यात आला होता. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nirav Modi brother Nehal charged with committing 2 million dollar fraud