नाराज नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर काँग्रेसमध्ये बदल सुरु; 2 प्रदेश प्रमुखांचा राजीनामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rahul_20soniya_20gandhi

शनिवारी नवी दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांची बैठक झाली.

नाराज नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर काँग्रेसमध्ये बदल सुरु; 2 प्रदेश प्रमुखांचा राजीनामा

नवी दिल्ली- शनिवारी नवी दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह पक्षातील नाराज नेत्यांची या बैठकीला उपस्थिती होती. बैठकीनंतर काँग्रेसने देशातील चार राज्यांमध्ये संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला तेलंगाना, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये बदल केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर तेलंगाना काँग्रेस अध्यक्ष उत्तम कुमार रेड्डी यांनी ग्रेटर हैदराबाद नगर निगममधील निवडणुकीतील दारुण पराभवाची जबाबदारी घेत आपला राजीनामा दिला आहे. 

बंगालमधील दहशतवादी कनेक्शनसंदर्भात अमित शहांनी NIA ला दिले खास आदेश

गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष अमित चावडा यांनीही पोटनिवडणुकीतील वाईट निकालानंतर पराभवाची जबाबदारी घेत राजीनामा दिला आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि पक्षनेते आहेत. त्यांनी काँग्रेस नेतृत्वासोबत पक्षातील 23 नाराज नेत्यांची बैठक घडवून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्यावरही पद सोडण्यासाठी दबाव आणला जात असल्याचं सांगितलं जात आहे. 

शनिवारी काँग्रेसने मुंबई प्रदेश काँग्रेस कमेटीमधेही बदल केले आहेत. जवळपास दीड वर्षानंतर अशोक अर्जुनराव जगताप उर्फ भाई जगताप यांना मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष करण्यात आले आहे. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात मुंबई काँग्रेससाठी रणनीति समिती बनवण्यात आली आहे. बाळासाहेब थोरात महाराष्ट्र राज्य काँग्रेस अध्यक्ष आहेत, तसेच पक्षनेते देखील आहेत. 

अर्थव्यवस्थेचं मोडलंय कंबरडं; मोदी सरकारची अर्थनीती सफशेल अयशस्वी ठरलीय का?

पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आसाम आणि केरळसाठी तीन-तीन अखिल भारतीय काँग्रेस कमेटी (एआयसीसी) सचिव नियुक्त केले आहेत. आसाम आणि केरळमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. नवनियुक्त सचिव दोन्ही राज्यांच्या प्रभारी महासचिवांची मदत करतील. जितेंद्र सिंह आसाम आणि तारिक अनवर केरळचे प्रभारी महासचिव आहेत.

दरम्यान, शनिवारी झालेल्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष निवडण्यासाठीही हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारावं, अशी मागणी बैठकीत जोराने करण्यात आली होती. त्यावेळी पक्ष जी जबाबदारी देईल, ती स्वीकारण्यास तयार असल्याचं राहुल गांधी म्हणाले होते. त्यामुळे अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा राहुल गांधी यांच्याकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Web Title: After Congress Meeting Organizational Changes Started 2 Pcc Resign

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CongressSonia Gandhi