esakal | भारतीयांसाठी 'कैलासा'चे दरवाजे बंद; नित्यानंदने घेतला निर्णय

बोलून बातमी शोधा

nityanand
भारतीयांसाठी 'कैलासा'चे दरवाजे बंद; नित्यानंदने घेतला निर्णय
sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- कोरोना महामारीने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे आपला देश सोडून एखाद्या बेटावर जाण्याच्या बेतात अनेकजण आहेत. पण, तुम्हाला कैलासा बेटावर जायचं असेल तर तुमचा हिरमुस होण्याची शक्यता आहे. कारण, स्वयंघोषित महाराज नित्यानंद याने कथितरित्या 2019 मध्ये स्थापन केलेल्या कैलासा बेटावर भारतीयांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नित्यानंदाने हा निर्णय घेतला आहे. त्याने ट्विटरवर यासंदर्भात पोस्ट टाकून माहिती दिली आहे.

भारतीय भाविकांना कैलासावर येण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. भारताशिवाय ब्राझील, यूरोपीय देश आणि मलेशिया या देशांनाही कैलासामध्ये येण्यास बंदी असणार आहे. नित्यानंद याने ट्विट करुन म्हटलं आहे की, जगभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे काही देशांच्या नागरिकांना कैलासमध्ये येण्यास बंदी असेल.

नित्यानंद 2019 पासून कैलासा बेटावर लपून बसला आहे. लैंगिक अत्याचाराप्रकरणी नित्यानंदावर गंभीर आरोप आहेत. तेव्हापासून नित्यानंदाने यूनायटेड नेशनकडे कैलासाला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याची मागणी केली आहे. नित्यानंद सोशल मीडियावरील काही व्हिडिओ आणि फोटोमुळे अनेकदा चर्चेत आला आहे. नित्यानंदाने कैलाशाला हिंदू सार्वभौम राष्ट्र म्हणून घोषित केलंय. त्याने स्वत:चे कॅबिनेट आणि पंतप्रधानाचीही नेमणूक केली आहे.

हेही वाचा: कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी दिली इनोव्हा गाडी

ऑगस्ट 2020 मध्ये नित्यानंदाने स्वत:च्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची घोषणा केली आहे. तसेच चलन म्हणून कैलासा डॉलर्सही जाहीर केले होते. बलात्काराचा आरोप झालेला नित्यानंद स्वत:ला कथित कैलाशा राष्ट्राचा प्रमुख मानतो. वेबसाईटनुसार, परित्यक्त हिंदूनी कैलाशा राष्ट्राची स्थापना केली आहे. दरम्यान, नित्यानंदाच्या नव्या आदेशावर अनेकांनी तोंडसुख घेतलंय.