
Protesters march in Washington DC and London during the global ‘No Kings’ movement, opposing Donald Trump’s immigration and education policies.
esakal
Summary
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात ‘No Kings’ आंदोलन वॉशिंग्टन ते लंडनपर्यंत पसरले.
आंदोलनात ट्रम्प यांच्या इमिग्रेशन, शिक्षण आणि सुरक्षा धोरणांचा निषेध करण्यात आला.
जगभरात २,६०० हून अधिक ठिकाणी ‘No Kings’ निदर्शने आयोजित करण्यात आली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी वॉशिंग्टन डी.सी.पासून लंडन पर्यंत हजारो लोक रस्त्यावर उतरले. या आंदोलनाला 'No Kings' असे नाव देण्यात आलेले असून. हे निदर्शनात ट्रम्प यांच्या इमिग्रेशन, शिक्षण आणि सुरक्षा धोरणांचा निषेध करण्यात येत आहे.आंदोलकांच्या आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण अमेरिका आणि जगभरात २,६०० हून अधिक 'No Kings'निदर्शने होत आहेत. लंडनमधील अमेरिकन दूतावासाबाहेरही शेकडो लोक जमले होते आणि त्यांनी म्हटले होते की ते ट्रम्प यांच्या हुकूमशाही प्रवृत्तींचा निषेध आहेत.