शानदार सोहळ्यात नोबेल पुरस्कारांचे वितरण

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

स्टॉकहोम : स्वीडनमधील कॉन्सर्ट हॉलमध्ये पार पडलेल्या शानदार सोहळ्यात यंदाच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांना गैरविण्यात आले. भैतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, अर्थशास्त्र तसेच, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शनिवारी रात्री पार पडलेल्या या कार्यक्रमात अमेरिकन गीतकार बॉब डिलन यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. डिलन यांना साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल जाहीर झालेला पुरस्कार त्यांच्या वतीने गायिका पाट्टी स्मिथ यांनी स्वीकारला. तत्पूर्वी त्यांनी डिलन यांचे "अ हार्ड रेन..' हे गाणे सादर केले. या वेळी त्या भावूक झाल्या. डिलन यांनी दिलेली प्रतिक्रिया कार्यक्रमात वाचून दाखविण्यात आली.

दरम्यान, नॉर्वेतील ओस्लो शहरात आयोजित कार्यक्रमात शांततेसाठी दिल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कोलंबियातील बंडखोरांबरोबर शांतता प्रस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे अध्यक्ष जुआन मॅन्युअल सॅन्टोस यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

डिलन यांची प्रतिक्रिया
''मला माफ करा, मी भावूक झालो आहे. हा पुरस्कार मला मिळेल याची कल्पनाही मी केली नव्हती.'' असे डिलन यांनी म्हटले आहे. डिलेन यांना पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर काही समीक्षकांनी त्यांचे साहित्य तितके दर्जेदार नसल्याचे म्हटले होते. कदाचित यामुळे डिलन यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे.

Web Title: nobel prize ceremony