

Nobel Prize 2026
esakal
Medicine Nobel Prize 2026: वैद्यक क्षेत्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. वर्ष २०२६ चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कार्ल डिसेरॉथ, पीटर हेगेमन आणि जॉर्ज नागेल या तीन शास्त्रज्ञांना जाहीर झाला आहे. प्रकाश-नियंत्रित आयन चॅनल्स आणि 'ऑप्टोजेनेटिक्स'वरील त्यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी हा बहुमान देण्यात आला आहे. ऑप्टोजेनेटिक्स हे एक असे तंत्रज्ञान आहे, ज्याच्या साहाय्याने जिवंत मेंदूतील चेतापेशी आपल्या आठवणी, भावना आणि वर्तनाला कशा प्रकारे आकार देतात हे स्पष्ट करणे शक्य झाले आहे.