नोबेल पुरस्काराचा मान यंदा तीन संशोधकांना संयुक्तरित्या मिळाला 

वृत्तसंस्था
Tuesday, 6 October 2020

वैद्यकीय क्षेत्रासाठीच्या नोबेल पुरस्काराचा मान यंदा तीन संशोधकांना संयुक्तरित्या मिळाला आहे. अमेरिकेचे हार्वे जे. अल्टर, चार्ल्स एम. राईस तसेच ब्रिटिश शास्त्रज्ञ मायकेल हाऊटन यांना ‘हिपेटायटीस सी’ विषाणूच्या शोधाबद्दल हा सन्मान जाहीर झाला.

स्टॉकहोम - वैद्यकीय क्षेत्रासाठीच्या नोबेल पुरस्काराचा मान यंदा तीन संशोधकांना संयुक्तरित्या मिळाला आहे. अमेरिकेचे हार्वे जे. अल्टर, चार्ल्स एम. राईस तसेच ब्रिटिश शास्त्रज्ञ मायकेल हाऊटन यांना ‘हिपेटायटीस सी’ विषाणूच्या शोधाबद्दल हा सन्मान जाहीर झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नोबेल समितीने सोमवारी पुरस्कारांची पहिली घोषणा केली. 12 तारखेपर्यंत विविध क्षेत्रांमधील नोबेलचे मानकरी जाहीर केले जातील. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र या इतर पाच पुरस्कारांची घोषणा टप्याटप्याने होईल. यंदा कोरोनाच्या जागतिक साथीमुळे वैद्यकीय नोबेल पुरस्काराचे महत्त्व आणि उत्सुकता वाढली होती. जागतिक समुदाय तसेच अर्थव्यवस्थेसाठी वैद्यकीय संशोधनाचे महत्त्वही अधोरेखित झाले होते. नेहमीच्या वापरासाठी मुलभूत विज्ञानावर आधारीत व्यवहार्य प्रक्रियांचा पाया रचणाऱ्या संशोधनाची दखल ही समिती घेते.

अटल बोगद्यामुळं चीनचा जळफळाट; बोगदा उडवून देण्याची ग्लोबल टाइम्सची भाषा

पुरस्काराचे स्वरूप
सुवर्ण पदक आणि एक कोटी क्रोनोर (11,18,000 डॉलर) बक्षीस रक्कम असे पुरस्काराचा स्वरूप आहे. स्वीडीश संशोधक आल्फ्रेड नोबेल यांनी 124 वर्षांपूर्वी दिलेल्या देणगीतून ही रक्कम देण्यात येते.

ट्रम्प गंभीर आजारी राहिल्यास काय होईल? निवडणुका टळतील की राष्ट्रपती बदलेल?

संशोधनाचे महत्त्व

 • रक्तदोषामुळे होणाऱ्या काविळीचे मुख्य कारण समजण्यास मदत
 • हिपेटायटीस ए व बी या विषाणूमुळे स्पष्ट न झालेल्या कारणाचा उलगडा
 • परिणामी रक्ताची चाचणी आणि नव्या औषधांचा उपचार शक्य
 • अत्यंत संवेदनशील असा रक्त चाचण्या विकसित
 • संसर्गविरोधी औषधांचे वेगाने संशोधन शक्य
 • संशोधनामुळे लाखो लोकांचे जीव वाचून आरोग्यात सुधारणा
 • जगातील अनेक ठिकाणी रक्तसंक्रमणानंतर उद््भवणाऱ्या काविळीची शक्यता नष्ट
 • हिपेटायटीस सी विषाणूचे समूळ उच्चाटन करण्याच्या आशा पल्लवित

काविळीचा धोका

 • जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्लूएचओ) हिपेटायटीस दरवर्षी जगात सात कोटी रुग्ण, चार लाख बळी
 • दीर्घकालीन रोगांमध्ये समावेश
 • यकृताचा दाह तसेच कॅन्सरचे एक मुख्य कारण

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nobel Prize was awarded jointly to three researchers this year